‘व्हिज्युअल आर्ट्स’ व साहित्य यांच्यात परस्पर संबंध – भास्कर हांडे
डाॅ. आंबेडकर महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रमाला प्रारंभ
औंध, ता.१८ (प्रतिनिधी) : "व्हिज्युअल आर्ट्स' आणि साहित्य यांच्यात परस्पर संबंध आहे, ज्याचा अभ्यास होणे ही काळाची गरज आहे. आपल्याकडील संत साहित्य हेही याचेच उत्तम उदाहरण आहे," असे मत आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्र-शिल्पकार भास्कर हांडे यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या येथील, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाविद्यालयात श्री.हांडे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या 'व्हिज्युअल आर्ट्स'मधील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य.डाॅ.अरूण आंधळे, डाॅ.सविता पाटील, डाॅ.प्रभंजन चव्हाण, प्रा.बद्रीनाथ ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. हांडे पुढे बोलताना म्हणाले, "भारतीय परंपरेत चौसष्ठ कला आहेत. या सर्व कला संगीत, नृत्य, चित्र, मुद्रकला, अभिया...