डॉ. आंबेडकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती समारंभ उत्साहात संपन्न

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती समारंभ उत्साहात संपन्न
मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रुती तांबे

औंध : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व महिला विकास मंच यांच्या वतीने ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती – महिला शिक्षक दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रुती तांबे मॅडम उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वसामान्य माणसाला शिस्तीत आणण्यासाठी फुले मंडईची स्थापना केली. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांना ‘सिस्टीम बिल्डर असे म्हटले जाते. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे खाजगी आणि सार्वजनिक जीवनात सारखेच जीवन जगत होते. त्यामुळे त्यांच्या हातून शैक्षणिक आणि सामाजिक कार्य झाले. सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या साथीच्या काळात अनेकांना दवाखान्यात नेण्याचे सामाजिक कार्य केले. तसेच समाजाला स्वावलंबन, स्वाभिमान आणि स्वदेश अभिमानाची शिकवणही दिली. आजच्या तरुण मुला-मुलींनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा. असे मत डॉ. श्रुती तांबे यांनी व्यक्त केले.

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती समारंभ उत्साहात संपन्न
मनोगत व्यक्त करताना अॅड. राम कांडगे

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी बोलताना ते म्हणाले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या थोर शिक्षण शास्त्रज्ञ तर होत्याच पण त्या पहिल्या कवयित्री सुद्धा आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रेरक शक्ती सावित्रीबाई फुले या होत्या. कारण पिढ्यान पिढ्या आडाणी असणाऱ्या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य फुले दाम्पत्याने केले. त्यामुळे आजच्या समाजाने फुले दाम्पत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करावे. असे मत अॅड. राम कांडगे यांनी केले.

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती समारंभ उत्साहात संपन्न
मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. अरुण आंधळे

कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालय विकास समिती सदस्य, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विकास रानवडे, विद्यार्थी समन्वयक सूर्यकांत सरवदे, पश्चिम विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहाय्यक अधिकारी एस.टी.पवार, प्रा. अरविंद जाधव, उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर हे कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती समारंभ उत्साहात संपन्न
मनोगत व्यक्त करताना डॉ. सविता पाटील

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ.सविता पाटील, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुहास निंबाळकर तर कार्यक्रमाचे आभार महिला विकास मंचच्या प्रमुख प्रा. नलिनी पाचर्णे यांनी केले. कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.