औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती-महिला शिक्षक दिन व खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागीय अध्यक्ष अॅड. राम कांडगे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विकास रानवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
रक्तदान शिबीरात औंध येथील कुस्ती तालीम संघातील तरुणांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. रयत विद्यार्थी परिषदेमधील तरुणांनी रक्तदान करून सामाजिक कार्यास हातभार लावला. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील मुला-मुलींनी या शिबीरात उस्फुर्तपणे सहभाग घेतल्यामुळे हे रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पडले.
रक्तदान शिबीराच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, पश्चिम विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहा. विभागीय अधिकारी एस. टी. पवार, उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर, रक्तदान शिबीराचे समन्वयक सूर्यकांत सरवदे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. सुशीलकुमार गुजर, प्रा. नलिनी पाचर्णे आणि ससून जनरल हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता.