लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणारा मूकनायक म्हणजेच “पत्रकार”

लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणारा मूकनायक म्हणजेच "पत्रकार"
  • राष्ट्र कि प्रगती मे “निष्पक्ष पत्रकार” विपक्ष से ज्यादा प्रभावशाली होता है “

पत्रकार म्हंटले कि एक पूर्वी चष्मा घातलेला , खांद्याला पिशवी अडकवलेला एक सुशिक्षित व्यक्ती असं चित्रण होत ,परंतु काळ बदलला तसा पत्रकारितेमध्ये सुद्धा मोठा बदल होत गेला . नव्हेतर पत्रकारितेचा चेहरा मोहरच बदलला . आधुनिक यंत्रणा, टेक्निकल स्किल्स, सोशल मीडिया अशा अनेक माध्यमातून हा बदल दिसत गेला.

पत्रकारांचं काम हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रातील माहिती मिळवणं त्याची बातमी बनवून लोकांपर्यंत पोहचवणे व त्यामाध्यमातून सामाजिक प्रबोधन करणे. अनेकवेळा शासकीय व्यवस्था, नेतेमंडळी, पोलीस यंत्रणा, गुन्हेगार यांच्याविरोधात सुद्धा पत्रकारांना भूमिका मांडाव्या लागतात. परंतु हे मांडत असताना निष्पक्ष व निर्भीडपणे लोकांसमोर आली तर अनेकांना न्याय मिळतो. अनेक चुकीचे प्रकार थंबतात. लोकशाहीत माध्यमांचं मोठं महत्व असतं. त्यामुळं ही माध्यमं टिकली पाहिजेत, त्यांच्या संवर्धनासाठी निर्भेळ वातावरण असण्याची गरज आहे. पत्रकारिता हा काही प्रामुख्यानं पैसा कमावण्याचा, नफा कमावण्याचा धंदा नसतो, असंही सांगितलं जातं. माध्यमांचं काम सकळजनांना शहाणं करणं असलं पाहिजे, माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचं व्रत सोडू नये अशीही अपेक्षा असते. पत्रकारांनी लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरु आहे, त्यावर तटस्थ भाष्य करुन दिशा देणंही अपेक्षित असतं. म्हणून पत्रकारितेला व्यवसाय म्हटलं जात नाही तर त्याला पेशा अर्थात व्रत, वसा म्हणून स्वीकारावं, असंही सांगितलं जातं.

पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे, सद्सत् विवेक जागृत ठेऊन ज्यांना स्वत:चा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यांपर्यंत, बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं, असंही अपेक्षित असतं. म्हणून पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावं. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्राचं नावं ‘मूकनायक’ ठेवलं होतं. पत्रकारांनी लोकांना नवी दृष्टी द्यावी, लोकांना डोळस करावं. पत्रकारांनी लोकप्रिय समजुती धुडकावत आपल्या श्रद्धास्थानांची चिकित्सा तटस्थपणानं करावी. त्यामुळे पत्रकार समाजातील काही घटकांच्या हितसंबंधांना धक्के देताना दिसतात. पण असे धक्के स्वीकारण्याची ज्या समाजाची मानसिकता नसते, तो समाज विकसित होऊ शकत नाही. माध्यमाने निरपेक्ष, पूर्वग्रहदुषितपणे विषय मांडू नयेत, अशीही अपेक्षा असते. त्यातून पत्रकार खरच आपलं कर्तव्य समर्थपणे जेव्हा पूर्ण करत असतो तेव्हा व्यवस्था त्यांच्या बाजुने उभी राहील, असे नाही. अनेक घटकांना सुखावताना काही घटकांची नाराजीही पत्रकारांना ओढवून घ्यावी लागते.

लोकशाहीवादी राजकीय व्यवस्था असणाऱ्या देशातील पत्रकारांचे जीवन सुरक्षित राहिलं नाही. युद्ध, दहशतवादी संघटनांच्या कारवायांबरोबरच हितसंबंधांच्या आड येणाऱ्या पत्रकारांना मोठ्या प्रमाणात जीव गमवावा लागतो आहे. महाराष्ट्र सरकारनं देशात पत्रकारांच्या सुरक्षितेसाठी कायदा मंजूर केला आहे. त्यामुळे पत्रकारांना सुरक्षेचं कवच प्राप्त होईल. एका जागतिक पातळीच्या संघटनेने केलेल्या अहवालानुसार मागील २० वर्षात आजपर्यंत ३००० पत्रकारांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यांचा आवाज बंद करण्यात आलाय. सिरिया, इराक, आफगाणिस्तान आणि लिबिया या देशातील अंतर्गत असंतोषाला पत्रकारांना बळी पडावं लागत आहे. यात मेक्सिमो, फिलिपाईन्स, रशिया या देशातील परिस्थिती फारशी चांगली नाही. *संबंध जग सध्या अस्वस्थतेच्या, भितीच्या सावटाखाली आहे. सध्या भारतातील पत्रकारितेचे मूल्यांकन सुद्धा कमी होत चालले आहे. अशा स्थितीत पत्रकारितेवरची विश्वासहर्ता कायम ठेवणे हे सर्व पत्रकार बांधवांसमोरील समोरील अहवान आहे. शिवाय असं वाटावं अशी परिस्थिती असताना 6 जानेवारी या दर्पण दिनांच्या पार्श्वभूमीवर आणि मराठी पत्रकार दिनाच्या दिवशी आपण सर्वांनी आपल्या देशाला अपप्रवृतींपासून दूर ठेऊन सर्वसामान्य नागरिकांना सामान नय्या व विकासाच्या सामान संधी कशा प्राप्त होतील यासाठी आपल्या कामाची योग्य दिशा ठरवली पाहिजे. अशा परिस्थितीत पत्रकार बांधवाना कसल्याही प्रकारची अडचण असेल तर आम्ही नेहमीच आपल्यासोबत आहोत.

लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणारा मूकनायक म्हणजेच "पत्रकार"

सिद्दीक शेख,

संस्थापक, अध्यक्ष, अपना वतन संघटना

मो. ९६६५४८४७८६