सजग नागरिकांनी एकत्र येत स्थापन केले काळेवाडी रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन

सजग नागरिकांनी एकत्र येत स्थापन केले काळेवाडी रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन

पिंपरी चिंचवड : काळेवाडी परिसरातील वाढत्या समस्या बघता प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यासोबतच सजग नागरिक म्हणून आपली पण काही कर्तव्य आहेत, हे लक्ष्यात घेऊन या परिसरातील समविचारी नागरिकांनी एकत्र येऊन काळेवाडी रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशनची स्थापना केली आहे.

असोसिएशनचे स्थापन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपला परिसर स्वच्छ, सुंदर, गुन्हेगारी मुक्त व विविध दैनंदिन जीवनातील समस्या त्वरित संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे मांडणे व योग्य पद्धतीने समस्या सोडविणे. यासोबतच वेगवेगळी पर्यावरण पूरक उपक्रम राबविणे, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणे व महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनचा प्रचार व प्रसार करून त्यांच योग्य मार्गदर्शन करणे.

संस्थेच्या मुख्य समितीमध्ये प्रमोद हाटे यांच्या अध्यक्षतेखाली, उपाध्यक्ष सुरेश पाटील, खजिनदार श्री भोई, सचिव प्रवीण अहिर तर सदस्य सुनंदा काळे, आशा इंगळे व ज्योती शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून आपला परिसर आपली जबाबदारी हे ध्येय ठेऊन पुढील काळात काम करण्याची इच्छा दाखवली.

सध्याच्या काळात नागरिकांना खुप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अवेळी होणारा पालिकेचा पाणीपुरवठा, रस्त्यावरून जाणाऱ्या उल्लाड पोरांचा त्रास, सांडपाण्याचा प्रश्न, नदीची झालेली दुरवस्था, पर्यावरण, बेरोजगारी व नियोजन करून विकास आराखडा यासारख्या सामान्य नागरिकांच्या रोजच्या जीवनातील समस्या लक्ष्यात घेऊन पुढील काळात काळेवाडी रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन आपली भूमिका मांडण्यासाठी सद्दैव प्रयत्नशील राहील. अशा विश्वास सचिव प्रवीण अहिर यांनी व्यक्त केला.

या अनुषंगाने २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिनी काळेवाडीतील पहिली खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पहिली ते सातवी या वेगवेगळ्या गटातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. कोरोना परिस्थितीमुळे ही स्पर्धा काळेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांपुरती मर्यादित आहे. ज्यांना चित्रकला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी २३ जानेवारीपर्यंत आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : प्रवीण अहिर ९८२२५१८६८४, वैभव घुगे ८८६२०००७१२, आशा इंगळे ८८५०३६१४२८, ज्योती शिंदे ७२६४८९४०१८.

सजग नागरिकांनी एकत्र येत स्थापन केले काळेवाडी रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन