डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात युवा दिन संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात युवा दिन संपन्न

पुणे : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंती सप्ताहाच्या निमित्ताने युवा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त मराठी विभागप्रमुख व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी “स्वामी विवेकानंद व आजचा युवक” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले..

स्वामी विवेकानंद यांनी स्वतःचे आयुष्य कष्टाने व्यतीत केले. त्यांनी युवकांना स्वामी विवेकानंदांचे आदर्श घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. आजच्या काळात सगळ्या गोष्टी सहजपणे मिळविण्याच्या नादात अनेक वेळा चुकीच्या मार्गांचा अवलंब केला जात आहे. परिणामतः युवकांना मेहनत व चांगल्या सवयी यापासून दूर राहावे लागत आहे. स्वामी विवेकानंद यांचा मित्रपरिवार, त्यांनी शिकागो येथे केलेल्या सर्वधर्म परिषदेतील भाषण, त्यांनी गुरु प्रती ठेवलेली श्रद्धा या सर्व युवकांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. म्हणून आजच्या काळातही या सर्व गोष्टी इतक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी युवा सप्ताह सादर करत असताना त्यांच्या विचारांचा विसर पडू देता कामा नये. असे प्रतिपादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात युवा दिन संपन्न

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शन करताना जीवनाचे चिंतन करून ते अंगीकारणे गरजेचे आहे. विवेकानंदांच्या जीवनातील विविध संकल्पना अतिशय स्पष्ट होत्या. जीवन कसे जगावे या विषयी त्यांनी स्वतःच्या कृतीतून युवकांना मार्गदर्शन केलेले आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांचे जीवन हे युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचा अंगीकार करणे हे आजच्या काळाची गरज आहे. असे प्रतिपादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात युवा दिन संपन्न

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. सौ. नलिनी पाचर्णे यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशीलकुमार गुजर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ मीनाक्षी कापरे यांनी तर आभार डॉ. अतुल चौरे यांनी केले. ऑनलाईन कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.