Tag: Dr Ambedkar College Aundh

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

पुणे : रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे केंद्र व राज्य शासन यांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक २७ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत "दक्षता जागृती सप्ताहाचे" आयोजन करण्यात आले होते. 'सतर्क भारत - समृद्ध भारत' ही संकल्पना घेऊन या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत शासनाने निर्देशित केल्यानुसार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर माननीय राज्यपाल व माननीय मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयात कार्यालयाच्या दर्शनी भागात मोजक्या ठिकाणी भित्तीपत्रक व कापडी फलक लावण्यात आले. तसेच दक्षता जनजागृतीनिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा परीक्षा घेण्यात आली...
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताह ऑनलाइन उपक्रमांनी साजरा
पुणे, शैक्षणिक

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताह ऑनलाइन उपक्रमांनी साजरा

औंध : पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम, वाड्मय मंडळ उद्घाटन समारंभ, ऑनलाईन व्याख्यान, ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धा, ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, ऑनलाईन नाट्यवाचन स्पर्धा, ऑनलाईन कर्मवीर जीवन दर्शन प्रदर्शन इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे साहेब यांनी सांगितले. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यम...
विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे | प्रा. डॉ. स्नेहल तावरे यांचे आवाहन
पुणे, शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे | प्रा. डॉ. स्नेहल तावरे यांचे आवाहन

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात "Thanks a Teacher अभियान" उपक्रम संपन्‍न पुणे : चालू काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही व्हायला पाहिजे. तसेच उद्योग व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रकाशक प्रा. डॉ. स्नेहल तावरे यांनी विद्यार्थ्यांना केले. औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त "Thanks a Teacher अभियान" उपक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रकाशक प्रा. डॉ. स्नेहल तावरे बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. अरुण आंधळे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी पाहुण्यांची प्रश्नोत्तराच्या स्वरूपात वार्तालाप केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाह...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
पुणे, सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

औंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी कोरोना या साथीच्या रोगाचा सामना करीत आहेत. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी लॉक डाऊनचे पालन करीत, गरीब आणि गरजू कामगार वर्गाला तोंडाला बांधण्याचा मास आणि जीवनावश्यक अन्नधान्याच्या कीटचे वाटप केले. तसेच कोवीड १९ या साथीच्या रोगासंदर्भात समाजात जनजागृतीचे कामही केले. कोरोना या साथीच्या रोगाची लक्षणे कोणती?, कोरोना या रोगाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्स राखणे, वैयक्तीक स्वच्छता राखण्यासाठी वारंवार साबनाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुने. वस्तू व सामानाची स्वच्छता राखण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करणे...