रमजान ईद निमित्त प्रमुखमान्यवरांच्या शुभहस्ते शिलाई मशीनचे वाटप

पुणे, दि.२८ (लोकमराठी) – हातावर पोट असणाऱ्या अनेक महिलांना मजुरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यातील अनेकींना घरगुती स्वरूपाचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. मात्र, भांडवलाअभावी अनेकांचे स्वप्न हे अपूर्णच राहते.नेमकी हीच गरज ओळखून रमजान ईद निमित्त शेर-ए-अली सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) गटाच्या वतिने गुरूवारी दि.२७ रोजी आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना शिलाई मशिनचे मोफत वाटप केले. व लहान मुलांना खाऊ वाटप व शिरखुर्मा वाटप तसेच जेवनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वडगावशेरीतील शिवराज शाळेजवळ सोमनाथ नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आपण आता स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो, या जाणीवेने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि कृतज्ञतेचे हसू फुलले. गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीन व लहान मुलांना खाऊ वाटप व शिरखुर्माचे वाटप महा.राज्य अध्यक्ष आर.पी.आय वाहतुक आघाडी अजीजभाई शेख, महा. राज्य सचिव आर. पी. आय, बाळासाहेब जानराव ,पुणे शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नारायण भाऊ गलांडे, नगरसेवक राहुल आप्पा भंडारे , महा राज्य संघटक आर. पी. आय परशुराम वाडेकर साहेब, पुणे जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय सेना अॅड. शनि भाऊ शिंगारे , संस्थापक आर के फाऊंडेशन आरतीताई सोनाग्रा आदी मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.

अजीजभाई शेख म्हणाले,समाजामध्ये धर्म जात-पात माणुसकीची असावी ईदला तुम्ही आमच्या घरी, दिवाळीला आम्ही तुमच्या घरी हाच महाराष्ट्राची संस्कृती पद्धत आहे. माणुसकी हाच आमचा धर्म आहे. सामाजिक न्याय केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांचा पक्ष म्हणजे हाच आमचा उद्देश आहे. सर्व समाजाने सनाच्या निमित्त एका ताटलित एकजुटीने उभे राहावे. नक्कीच आपण सर्व भारत देशात संदेश चांगलं पोहोचू शांतता देशामध्ये एकात्मता राहील. हीच अपेक्षा करूया रमजान ईद रोजचा महिना पवित्र महिना असल्याकारणाने दुवा करत असताना महाराष्ट्रात नव्हे तर अख्या जगात शांतता असावी. आजार बाजार असून लांब राहावे. सर्व जगासाठी इच्छा दिवशी समाज जात-पात साईटला ठेवून जगासाठीच अल्ला पासून अपेक्षा करून दुवा मागण्यात येत आहे. माझा देश माझे जबाबदारी उदाहरणार्थ आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही, श्रमगंगेच्या तीरावरती नाव वेगळे नाही, आम्हा गाव वेगळा नाही, मार्ग वेगळा नाही, आम्हा स्वर्ग वेगळा नाही, माणुसकीचे अभंग नाते पंथ वेगळा नाही, आम्हा संत वेगळा नाही, कोटी कोटी हे बळकट बाहू, कष्टकऱ्यांची अमुची वस्ती, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, आम्हीच अमुचे भाग्यविधाते, जगन्नाथ-रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. याप्रसंगी अजीजभाई शेख यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना संबोधित करून आयोजकांचे आभार मानत शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक: शेर- ए-अली सोशल फाऊंडेशन व रिपाई (A) पुणे शहर युवक उपाध्यक्ष फिरोज खान, अध्यक्ष: शेर-ए-अली सोशल फाऊंडेशन चिरागभाई खान, उपाध्यक्षः शेर-ए-अली सोशल फाऊंडेशन अफजलभाई खान, कार्याध्यक्षः शेर-ए-अली सोशल फाऊंडेशन सॅन्डी भाई शिंदे यांनी केले होते.