एस. एम. जोशी कॉलेजमधील 2 MAH BN NCC विभागातील विद्यार्थ्यांची दिल्ली येथील रिपब्लिक डे 23 परेडसाठी निवड

एस. एम. जोशी कॉलेजमधील 2 MAH BN NCC विभागातील विद्यार्थ्यांची दिल्ली येथील रिपब्लिक डे 23 परेडसाठी निवड

हडपसर (प्रतिनिधी) : भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुरमु यांच्या उपस्थितीत 74 वा प्रजासत्ताक दिन राजपत दिल्ली येथे संपन्न होणार आहे. 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन परेड मध्ये एस. एम. जोशी कॉलेजमधील राष्ट्रीय छात्र सेनेमधील तीन कॅडेट्स सहभागी होणार आहेत.

एस. एम. जोशी कॉलेजमधील 2 MAH BN NCC विभागातील विद्यार्थ्यांची दिल्ली येथील रिपब्लिक डे 23 परेडसाठी निवड

यावर्षीचा विशेष बहुमान प्राप्त झालेले एस. एम. जोशी कॉलेजमधील सुरज बाळासाहेब घरत, निखिल अशोक घटी, गिरीश नंदविजय लाड हे तीन कॅडेट्स आहेत. एकूण 250 कॅडेट्स मधून 2- महाराष्ट्र बटालियन व एनसीसी विभाग एस. एम. जोशी कॉलेज हडपसर यांच्या तीन कॅडेट्सची निवड राजपथ दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी झाली आहे.

या सर्व कॅडेट्सचे महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे, जनरल बॉडी सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे, मा.अमर तुपे यांनी कॅडेट्सचे विशेष अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड, एन.सी.सी. विभागाचे विभागप्रमुख डॉ.के. बी. पठाडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, प्रा. संजय जडे, आय. क्यू. ए.सी. को-ऑर्डिनेटर डॉ.के.पी.काकडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन सेवक यांनी कॅडेट्सचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.