प्रबुद्ध संघातर्फे चिंचवडगाव येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

प्रबुद्ध संघातर्फे चिंचवडगाव येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा 

चिंचवडगाव : प्रबुद्ध संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त मेजर शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मेजर शिंदे यांनी युद्धामधील काही प्रसंग सांगितले. ” देश एक संघ राहण्यासाठी आपल्याकडे संविधान लाख मोलाचं आहे, ख-या अर्थाने लोकशाही ही जगात जर श्रेष्ठ असेल तर संविधानामुळेच आहे. असे मेजर शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

या वेळी प्रदिप पवार, पारबत गुरूजी, डॉ. धर्मेंद्र रामटेके यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुरेश भोईर, मधुकर बच्चे यांच्यासह बहूसंख्य नागरिक व प्रबुद्ध संघाचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रबुद्ध संघाचे सचिव किशन बलखंडे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिंगबर घोडके, राजू वासनिक, दिलीप गोडबोले यांनी सहकार्य केले.