बेटी बचाओ जनआंदोलनात एस. एम. जोशी कॉलेज सहभागी

बेटी बचाओ जनआंदोलनात एस. एम. जोशी कॉलेज सहभागी

हडपसर, ३० जानेवारी २०२३ (प्रतिनिधी) : ‘जन्माचे स्वागत करण्यासाठी त्यातही मुलीच्या जन्माचे’? दचकलात ना. होय आम्ही बेटी बचाव जन आंदोलनवाले Medicare Hospital Foundation मध्ये प्राप्त झालेल्या कन्येचा धूमधडाक्यात साजरा करतोय.

असाच आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न आज सौ. रुक्साना अमन सय्यद यांना प्राप्त झालेल्या मुलीचा जन्मोत्सव आज प्राचार्या अश्विनी प्रितम शेवाळे, प्रा. शिला कुदळे, प्रा. मीनाक्षी पवार, डॉ. निशा गोसावी, डॉ. ऋषिकेश खोडदे, डॉ.दिनकर मुरकुटे, प्रा. स्वप्नील ढोरे, डॉ. अतुल चौरे, एन. एस. एस. चे विद्यार्थी, अमन सय्यद यांचे नातेवाईक, हॉस्पिटलचा स्टाफ व डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

बेटी बचाओ जनआंदोलनात एस. एम. जोशी कॉलेज सहभागी

डॉ. शंतनु जगदाळे यांनी सूत्रसंचालन करून समाजात घडणाऱ्या घटना सध्यस्थिती यावर विवेचन केले. बेटी बचाव जन आंदोलनच्या समन्वयक तृप्ती राख यांनी गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेल्या कार्याची आणि बेटी बचाव जनआंदोलनाची माहिती विशद केली. डॉ. लालासाहेब गायकवाड समन्वयक बेटी बचाव जनआंदोलन यांनी देश विदेशातील आंदोलनाची माहिती सांगून, आज रोजी आमच्या बरोबर चार लाख डॉक्टर्स तेरा हजार सामाजिक संस्था आणि पंचवीस लाख स्वयंसेवक पूर्ण जगभर मुलींच्या जन्माचे स्वागत करीत आहेत. याचा उल्लेख केला. बेटी बचाव जनआंदोलनाचे जनक डॉ.गणेश राख सर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या आनंद उत्सवात प्रमुख पाहुणे, हॉस्पिटलचा स्टाफ, डॉक्टर व अमन सय्यद यांचे नातेवाईक इ. नी आपली मनोगते व्यक्त केली.

प्रमुख पाहुणे, मुलीचे आई वडील इ. चा यथोचित सत्कार करण्यात आला. केक कापून मेणबत्तीच्या उजेडात डॉ.विजय जोशी यांनी घोषणांची आतेषबाजी करून वातावरण आनंदित केले. पुष्पवृष्ठी फटाक्यांची आतेषबाजी करून समाधानपूर्वक मुलीला तिच्या आई-वडील व नातेवाईक यांच्याकडे सुपूर्त करून तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.