एस. एम. जोशी कॉलेजमध्ये Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन 

हडपसर, ता. १७ ऑगस्ट २०२३ (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. या वर्कशॉपच्या अंतर्गत मुलांना कॉस्मॅटिकस मध्ये वापरले जाणारे २० हुन अधिक वनस्पतींची माहिती आणि त्याचा उपयोग सांगण्यात आला.

भारत देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या महत्त्वाच्या औषधी वनस्पती बद्दल माहिती आणि दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल याचे प्रशिक्षण वर्कशॉप मध्ये देण्यात आले. कोरफड, हळद, चंदन, यापासून साबण बनवण्याचे प्रशिक्षण त्याचबरोबर शिककाई पासून शाम्पू बनवण्याचे प्रशिक्षण या वर्कशॉप मध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आले. आपल्या घरात आपण कुंडीमध्ये वगैरे कोरफड लावतो. या कोरफडीचे अनेक फायदे आहेत. कोरफड सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा डोळे-केस यांची निगा राखण्यासाठी फायदेशीर ठरते. कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मांमुळे सर्दी, खोकला, दमा, सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवर उपयुक्त ठरते. अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्त विकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते. जळणं, भाजणं, आग होणं, पित्त होणं या प्रकारच्या त्वचा विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते.

कोरफडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. ताजा कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. परंतु कोरफड केवळ केस किंवा त्वचेसाठी आरोग्यदायी नसून आहारात घेतल्याने आजारांपासूनही आराम मिळतो. या रसातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरात पसरलेले फ्री-रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी लोक कोरफडीचा वापर करतात. त्याचबरोबर शिकेकाई ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती असून तिला आयुर्वेदातही विशेष स्थान मिळाले आहे. शिकेकाईचा वापर केसांवर शतकानुशतके केला जात आहे. या औषधी वनस्पतीचे अनेक फायदे आहेत जे केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. या औषधी शिकेकाई पासून शाम्पू बनवायचा व कोरफडी पासून साबण बनवण्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक वर्कशॉप मध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आले. वर्कशॉप समन्वयक आणि वनस्पती शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिल्पा शितोळे यांनी दैनंदिन जीवनामध्ये वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या औषधी वनस्पती बद्दल माहिती आणि त्यामध्ये असणारे सेकंडरी मेटॅबोलाइट्स याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

या वर्कशॉप साठी मा. प्रभा दळवी यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वेगवेगळे हर्बल सोप आणि शिकाकाई शाम्पू विविध इन्ग्रेडिअनट्स वापरून तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच बाहेरून कॉस्मॅटिकस चा वापर करण्याबरोबरच पोटातून हि खाण्यापिण्याच्या सवयी, सकस आहार, फळाचे, पाण्याचे आणि जूस चे महत्वही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यासाठी कमर्सिअली वापरण्यात येणारा गव्हांकुर त्याचे शारीरिक फायदे, तो तयार कसा करायचा आणि मार्केट व्यालू सांगण्यात आली. असाइनमेंट च्या माध्यमातून तो मुलांनी घरी तयार केला. मुलांमध्ये मार्केटिंग स्किल रुजवण्यासंदर्भात जाहिरात तयार करणे, सेमिनार, तसेच लोगो कसा तयार करायचा, बॉटल कशी असावी त्याचे कव्हर कसे असावे, इन्ग्रेडिअनट्स कसे आणि किती टाकावे, किंमत किती असावी आदींची माहिती देण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेला साबण आणि शाम्पू याचे पॅकेजिंग त्यांच्याकडूनच तयार करून घेण्यात आले.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन 

एस. एम. जोशी महाविद्यालयांमध्ये हा वर्कशॉप घेण्यासाठी मा. प्राचार्य एन. एस. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. हा वर्कशॉप जास्तीत जास्त यशस्वी होण्यासाठी वर्कशॉपच्या कॉर्डिनेटर व वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. शिल्पा शितोळे, प्रा. ऋषिकेश खोडदे, प्रा. शुभम काशीद, प्रा. वैभव कोडलिंगे, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, प्रा. डॉ. किशोर काकडे, प्रा. डॉ. संजय जगताप, कार्यालय प्रमुख श्री शेखर परदेशी, प्रा. डॉ. हेमलता कारकर, प्रा. डॉ. रंजना जाधव, प्रा. संगीता यादव, प्रा. किसन पठाडे, प्रा. दत्ता वसावे, प्रा. डॉ. अशोक पांढरबळे, लॅब अटेंडंट पांडुरंग मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रा. शुभम काशीद यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.