स्वातंत्र्यदिनानिमित्त सीआयई इंडिया इन्स्टट्यूट ऑफ स्किलच्या लर्नेटस्किलच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर

स्वातंत्र्यदिनानिमित्त सीआयई इंडिया इन्स्टट्यूट ऑफ स्किलच्या लर्नेटस्किलच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर 

भोसरी : येथील सीआयई इंडिया इन्स्टट्यूट ऑफ स्किलच्या लर्नेटस्किल या संस्थेत विद्यार्थ्यांकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी परिसरात आनंदाचे व उत्सुकतेचे वातावरण दिसून आले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त लर्नेट स्किल तर्फे अनेक उपक्रम राबविण्यात आले तसेच इमारतीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी तिरंगा ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत गाण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाषण, देशभक्तीपर गीत व पथनाट्य सादर करून देशाविषयी असलेली प्रेम भावना दर्शवली. एकतेचा संदेश देणारी रांगोळी ध्वजस्तंभाजवळ रेखाटण्यात आली होती. रंगबेरंगी फुलांनी ध्वजस्तंभ सजवण्यात आला होता. यावेळी स्किल्स हेड ऋषिकेश शेडगे, मजीद खान, अतुल ढहाणे, अनिता निकम, प्रदीप भिसे, वर्षा कदम आदि उपस्थित आहे.