स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्य वाटप

स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्य वाटप 

लोकमराठी न्यूज नेटवर्क : स्वातंत्रदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल मोहाने व जिल्हा परीषद शाळा मोहाने येथे २००६ साली उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या वतीने शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास शालेय कमिटीचे चेअरमन संतोष मोरे, हायस्कूलचे मुख्याध्यापक धनंजय नायकल सर, प्राध्यापक मुरूमकर सर व प्राध्यापक महाडिक मॅडम उपस्थित होत्या. ज्यांच्या संकल्पनेतून साहित्य वाटप करण्यात आले असे कोकण खेड युवाशक्तीचे अध्यक्ष रुपेश मोरे, नितेश मोरे, अजय मोरे व अरुण यादव उपस्थित होते. तसेच शैक्षणिक साहित्य वाटपासाठी ज्यांनी योगदान दिले असे न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.