Tag: Maharashtra

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन 
शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन

हडपसर, ता. १७ ऑगस्ट २०२३ (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. या वर्कशॉपच्या अंतर्गत मुलांना कॉस्मॅटिकस मध्ये वापरले जाणारे २० हुन अधिक वनस्पतींची माहिती आणि त्याचा उपयोग सांगण्यात आला. भारत देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या महत्त्वाच्या औषधी वनस्पती बद्दल माहिती आणि दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल याचे प्रशिक्षण वर्कशॉप मध्ये देण्यात आले. कोरफड, हळद, चंदन, यापासून साबण बनवण्याचे प्रशिक्षण त्याचबरोबर शिककाई पासून शाम्पू बनवण्याचे प...
Hari Narke : पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन
महाराष्ट्र, ताज्या घडामोडी, मोठी बातमी

Hari Narke : पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

पुणे (लोकमराठी न्यूज) : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. Asian Heart Hospital मध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेच्या उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी हरी नरके आजच पहाटे पुण्याहून मुंबईला येत होते. येताना पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यामुळे बीकेसीच्या एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासन...
अग्निशमन दल व वाईल्ड एनिमल्स स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीने दिले कुत्र्यांना जीवनदान 
पुणे

अग्निशमन दल व वाईल्ड एनिमल्स स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीने दिले कुत्र्यांना जीवनदान

पुणे (लोकमराठी न्यूज) : डांबराच्या ड्रममध्ये फसलेल्या दोन कुत्र्यांच्या पिल्लांना पुणे अग्नीशमक दल व वाईल्ड एनिमल्स स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीच्या अथक प्रयत्नांनंतर जीवनदान मिळाले. सविस्तर वृत्त असे की, पुणे अग्निशमन दलातील फायरमन नुदार रवी बारटक्के यांनी वाईल्ड एनिमल्स स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी या संस्थेला मदत मागितली. कारण, टेकडीवर त्यांचे वाहन घटनास्थळी पोहचू शकत नव्हते. घटनास्थळी असलेले चित्र मन हेलवणारे होते. डांबराने भरलेल्या ड्रममध्ये दोन छोटे कुत्र्याची पिल्ले अर्ध्या शरीराने अडकलेली होती. https://youtu.be/WXHaMlfo6yM खूप काळजीपूर्वक ड्रम टेकडीवरून खाली घेण्यासाठी ट्रॅक्टर बोलावण्यात आला. संदेश रसाळ आणि लक्ष्मण वाघमारे यांनी आनंत अडसूळ यांना कॉल केला आणि संस्थेचे अध्यक्ष या नात्याने ते देखील स्पॉटवर पोहोचले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणि वाईल्ड ऍनिमल्स अ...
Job Opportunities : नोकरीची संधी
नोकरीविषयक

Job Opportunities : नोकरीची संधी

इंदिरा ग्लोबल स्कुल ऑफ बिझनेस / Indira Global School Business प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कंप्यूटर सायन्स भारती विद्यापीठ / Bharati Viyapeeth सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी पुणे पेट्रोल पंपावर कामगार पाहिजे पेट्रोल पंपावर महिला व पुरूष कामगार पाहिजे. पत्ता- जयहिंद हायवे सर्व्हिस स्टेशन, चिंचवड स्टेशन, निरामय हॉस्पिटल शेजारी. संपर्क : 9822551162 ...
मातंग समाजासाठी झटणारा तारा निखळला
महाराष्ट्र

मातंग समाजासाठी झटणारा तारा निखळला

मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय लहू शक्तीचे संस्थापक-अध्यक्ष मधुकरराव कांबळे यांचे निधन अकोला, ता. २५ (लोकमराठी न्यूज) : मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय लहू शक्तीचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री मधुकरराव कांबळे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी (ता. २५ जुलै २०२३) अकोला येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर व समाजावर शोकाकुल पसरली आहे. त्यांच्यावर पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्षही होते. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी (ता. २६ जुलै) एक वाजता उमरी, स्मशानभूमी (रेल्वे लाईन जवळ) Akola येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पुर्वी त्यांचे पार्थिव राज्यातील कार्यकर्त्यांच्या अत्यंदर्शनासाठी अकोला येथील त्यांच...
नागपूरच्या किट्टुबिटुब्लॉगर्सनी फूड ब्लॉगिंगमध्ये रचला विश्वविक्रम
खवय्ये

नागपूरच्या किट्टुबिटुब्लॉगर्सनी फूड ब्लॉगिंगमध्ये रचला विश्वविक्रम

नागपुर (लोकमराठी न्यूज) : किट्टूबिट्टूवीलॉगर्स (kittubittuvloggers) ला अलीकडेच "इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड्स" ने भारतातील सर्वात तरुण फूड व्लॉगर्स म्हणून सन्मानित केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. किट्टूबिट्टूवीलॉगर्स ना देखील अलीकडेच 94.3 MYFM रेडिओ चॅनलवर मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. जेथे त्यांनी वाहतूक नियंत्रण नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एका मोठ्या उपक्रमात भाग घेतला होता. "तुम्ही तरुण आणि प्रतिभावान असाल, तर तुम्हाला पंख असल्यासारखे वाटते" असे म्हणतात. आशिष आणि श्रीमती भावना यांच्या पोटी जन्मलेल्या नक्ष (८ वर्षे) आणि सिद्धार्थ धिंग (६ वर्षे) या दोन मास्टरमाइंड भाऊंच्या कामातही हेच सिद्ध झाले आहे. किट्टूबिट्टूवीलॉगर्स हे देशातील सर्वात तरुण व्यावसायिक व्लॉगर्स आहेत. ज्यांनी विविध ...
अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? – जयंत पाटील
महाराष्ट्र, मोठी बातमी

अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? – जयंत पाटील

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर : गुजरात (Gujarat) निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र (Maharashtra) कुठे नेऊन ठेवणार आहात ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress party) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारला केला आहे. वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात (Nagpur) येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्ली...
कोल्हापूरात कळंब्यातील वटवृक्षाला मिळाले जीवनदान
महाराष्ट्र

कोल्हापूरात कळंब्यातील वटवृक्षाला मिळाले जीवनदान

कोल्हापूर : कळंबा तलाव परिसरात अतिवृष्टीमुळे शुक्रवारी (ता. १५) उन्मळून पडलेल्या वटवृक्षाला आज निसर्गप्रेमींच्या मदतीमुळे जीवनदान मिळाले. या वटवृक्षाबाबत अभिनेते व सह्याद्री देवराईच्या सयाजी शिंदे यांनी कोल्हापूरातील निसर्गप्रेमींना हाक दिली, व बघता बघता ही बातमी कळताच कोल्हापूर परिसरातील निसर्गप्रेमी एकत्र आले. सुहास वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कळंबा ग्रामपंचायतीचे सरपंच सागर भोगम, निसर्गमित्र परितोष उरकुडे, प्रशांत साळुंखे, अभिजीत वाघमोडे, अमर गावडे, मनीषा ससे, डॉ. सुधीर ससे, समरजीत नाईक यांनी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम व संजय घोडावत ग्रुप टीम यांच्या सहकार्याने उन्मळून पडलेले हे वडाचे झाड योग्य टेक्निकल पद्धतीने अगदी कमी वेळात पुनरोपण (Replant) केले. ...
महाराष्ट्र बचाओ नाही, हे तर भाजप बचाओ आंदोलन – बाळासाहेब थोरात
राजकारण, महाराष्ट्र, मोठी बातमी

महाराष्ट्र बचाओ नाही, हे तर भाजप बचाओ आंदोलन – बाळासाहेब थोरात

राज्यातील भाजप नेत्यांची निष्ठा महाराष्ट्राशी नाही, दिल्लीतील भाजप नेत्यांसोबतभाजप नेत्यांनी महाराष्ट्रद्रोह करू नये मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन हे महाराष्ट्र बचाओ आंदोलन नसून भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहेत, या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही, त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून ह्या आंदोलनाचा फार्स उभा केला जात आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. व्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, 'कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही, सर्वांनी एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही ही भूमिका मांडली ह...
#coronavirus : राज्यात १०१८ कोरोना बाधित रुग्ण ; ७९ जणांना घरी सोडले
मोठी बातमी, महाराष्ट्र

#coronavirus : राज्यात १०१८ कोरोना बाधित रुग्ण ; ७९ जणांना घरी सोडले

12 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण - आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 150 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या 1018 झाली आहे. कोरोनाबाधित 79 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 875 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली. राज्यात मंगळवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या 20 हजार 877 नमुन्यांपैकी 19 हजार 290 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 1018 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 79 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 34 हजार 695 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 4008 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. निजामुद्दीन येथील झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्ह...