Tag: Maharashtra

कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी माजी सैनिक सज्ज
राष्ट्रीय

कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी माजी सैनिक सज्ज

या कठीण प्रसंगी स्वतःहून सेवा देण्याचे सेवानिवृत्तांचे उद्दिष्ट नवी दिल्ली, 2 एप्रिल : कोविड -19 महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना राष्ट्र करीत असताना, संरक्षण मंत्रालयाच्या (एएसएम) माजी सैनिक कल्याण विभागाने (ईएसडब्ल्यू),आवश्यक तेथे मनुष्यबळ वाढवून राज्य आणि जिल्हा प्रशासनास मदत करण्यासाठी माजी सैनिकांची मदत घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एखादा संपर्क क्रमांक शोधणे, सामुदायिक पाळत ठेवणे, विलगीकरण सुविधांचे व्यवस्थापन किंवा त्यांना नेमून दिलेले कोणतेही सार्वजनिक उपक्रम राबविण्यात राज्य आणि जिल्हा प्रशासनास मदत करण्यासाठी जास्तीत जास्त सेवानिवृत्त स्वयंसेवकांची ओळख पटवून त्यांना एकत्रित करण्यात राज्य सैनिक मंडळे आणि जिल्हा सैनिक मंडळे महत्वाची भूमिका बजावत आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीत देशाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत स्वतःहून सेवा दे...
#coronavirus : कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!
मोठी बातमी, महाराष्ट्र

#coronavirus : कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!

लोकमराठी : कोरोना (covid-19) या आजारावर योग्य उपचार व मनाची सकारात्मकता असेल तर त्यावर विजय मिळविणे कठिण नाही. असे मत एका कोरोनावर मात केलेल्या रूग्णाने व्यक्त केले आहे. या रूग्णाने आपला अनुभव सांगताना म्हटले आहे की, माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात भारतात (नागपुरात) परतल्यावर त्यापैकी 3 सहकाऱ्यांना कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह आली. हे ऐकून मी घरीच स्वत:ला क्वारंटाईन केलं. आणि नंतर माझ्या सेाबत आलेल्या मित्रांसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी गेलो. मला असिम्टोटिक कोरोना झाल्याचं निदान झालं. म्हणजे कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणं मला नव्हती. तरी मला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. कोरोना असल्याचं कळलं. त्यामध्ये मला मल्टीविटामीनच्या गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासा...
निर्भया फाउंडेशनतर्फे भटक्या प्राण्यांसाठी रूग्णवाहिका व निवारा
पिंपरी चिंचवड

निर्भया फाउंडेशनतर्फे भटक्या प्राण्यांसाठी रूग्णवाहिका व निवारा

लोकमराठी न्यूज नटवर्क पिंपरी : रहाटणी येथील निर्भया फाउंडेशनच्या वतीने वाल्हेकरवाडी येथे भटके व पाळीव प्राण्यांसाठी निवारा आणि प्राणी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्राणी निवारा शेडचे उद्धाटन आणि रूग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच महापालिका शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपळे सौदागर येथे पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शितल मुकणे, कंपेशन फॉर ऑलच्या अध्यक्षा पुनीता खन्ना, अनिकेत मेमाणे, महाराष्ट्र प्राणी वेलफर असोसिएशनच्या सल्लागार नेहा पंचमिया, डॉ. प्रशांत चेन्नई, कोकणे चौक ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक शरद कोकणे, निर्भया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उल्हास कोकणे आदी उपस्थित होते. राहुल कलाटे म्हणाले की, "आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो. तशीच प्राण्यांचीही घेतली पाहिजेत. भुतदया म्हणून निर्भया फाउंडेशनने ज...
यशस्वी होण्यासाठी महापुरुषांची चरित्रे वाचा – डॉ. खेडकर
पिंपरी चिंचवड

यशस्वी होण्यासाठी महापुरुषांची चरित्रे वाचा – डॉ. खेडकर

पिंपरी (लोकमराठी) : ज्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे त्या क्षेत्रातील यशस्वी झालेल्या महापुरुषांची चरित्रे वाचली पाहिजेत. त्यांचा आदर्श घेवून वाटचाल करावी. असे मत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे उपकुलपती तथा उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांनी दिला. म्हेत्रे वस्ती-चिखली येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने समाजसेवक श्रीनिवास राठी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रकाश दिलपाक यांना समाज गौरव पुरस्कार,साधना चव्हाण व पल्लवी कांबळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अखिल भारतीय धनगर समाज प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, शिवाजी घोडे, हनुमंत म्हेत्रे, अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकट वाघमोडे, उपाध्यक्ष मोहन देवकाते आदी उपस्थित ...
PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी चिंचवड

PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

रस्ते डांबरीकरणाच्या लेखी आश्वासनाचा अधिकाऱ्यांना पडला विसर काळेवाडी (लोकमराठी) : विविध विकास कामांसाठी खोदण्यात आलेल्या काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन दखल घेत नाही. विशेष म्हणजे रस्ते डांबरीकरणाचे लेखी आश्वासन देऊनही प्रशासन गंभीर नसल्याने रस्ते दुरूस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. पाणीपुरवठा वाहिनी, सांडपाणी वाहिनी तसेच खासगी टेलिफोन कंपन्यांची केबल टाकण्यासाठी ज्योतीबानगर, राजवाडेनगर, कोकणेनगर परिसरातील रस्त्यांची खोदाई करण्यात आली. मात्र, त्यांची दुरूस्ती योग्य पद्धतीने न झाल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. काही रस्ते विविध कामांसाठी सतत खोदल्याने रस्त्यांवर खड्डे पडले असून खडी पसरली आहे. त्यामुळे घसरून पडण्याचे अपघात नि...
70 वर्षीय आजीबाई इमोव्हा गाडीतून विकतात भाजी
पुणे

70 वर्षीय आजीबाई इमोव्हा गाडीतून विकतात भाजी

पुणे-हिंजवडी : वयाच्या साठीनंतर अनेकजण आराम करण्याचा विचार करत असतात. मात्र, याला अपवाद आहेत माण गावातील सुमन निवृत्ती भरणे. या 70 वर्षीय आजीबाई चक्क न्यू ब्रॅण्ड इनोव्हामधून ताजा भाजीपाला विकताहेत. दिवसभरात यातून त्यांची कमाई तब्बल आठ हजारांची असते. हिंजवडी नजीकच्या माण गावात भरणे कुटुंबीयांची 15 एकर शेती आहे. भरणे आजी या वयातही संपूर्ण ताकदीने आजही शेतात राबतात. विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, गहू, बाजरी, ज्वारी पिकवली जाते. आजीचा रोजचा दिवस पहाटे ठीक साडेपाच वाजता सुरू होतो. सहा वाजेपर्यंत त्या शेतात असतात आणि सगळा भाजीपाला काढून आणतात. त्यांच्या जुड्या बांधणे, कडधान्यांचे पॅकिंग केल्यावर इनोव्हामध्ये "लोड' केला जातो. सोबत त्यांचा मुलगा असतो. सकाळी 9 वाजेपर्यंत कधी सांगवीमध्ये; तर कधी हिंजवडी आयटी पार्क; तर कधी बाणेर, पाषाणमध्ये त्या भाजी विकतात. दिवसाला सुमारे तीन...
महाराष्ट्र हित महत्त्वाचे! जनमताचा आदर व्हायला हवा!
विशेष लेख

महाराष्ट्र हित महत्त्वाचे! जनमताचा आदर व्हायला हवा!

काँग्रेसचे तरुण नेते शिवसेनेसोबत सत्तेसाठी उत्सुक! शीतल करदेकर काँग्रेस पक्षाचे मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे काँग्रेस पक्षासाठी हितकारक कधी होते. याचा शोध आणि बोध पक्षाने घेण्याची वेळ आली आहे. बदलत्या राजकीय समीकरणात अनेक पक्ष प्रादेशिक पातळीवर सहकार्य करून सत्ता स्थापन करत आहेत, त्यात भारतीय जनता पार्टी पक्ष आघाडीवर आहे. सत्ता मिळवणे आणि मिळवलेल्या सत्तेचा लोकहितासाठी उपयोग करणे हा उद्देश मुख्यता असायला हवा. मात्र, मागील अनेक वर्षात जुनी राजकारण बदलून व्यक्तिकेंद्री राजकारणाला खतपाणी मिळाले आहे. विविध पक्ष, त्यात विविध गट आणि सत्ताकेंद्रे तयार झालीत. विविध प्रांतात अनेक वतनदार तयार झाले. शिक्षण महर्षी, कार्यसम्राट, कारखानदार आणि आता व्यापारी वाढले! मिळालेल्या सत्तेचा गैरवापर न करता जनतेचे पालक म्हणून काम करणे, हाच मुख्य उद्देश असायला हवा हे बहुसंख्य राजकारणी व...
राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या
मोठी बातमी, महाराष्ट्र

राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या

मुंबई (लोक मराठी न्यूज) : राज्य गृह विभागाने राज्यातील तब्बल 35 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात कोठुन कोठे बदली झाली ते ठिकाण) : बांदेकर दामोदर वसंत (रत्नागिरी ते मुंबई शहर), पाटील सुधीर भिमराव (वाशिम ते मपोअ, नाशिक), मंडलवार जयदीश शिवाजी (लोहमार्ग, औरंगाबाद ते यवतमाळ), श्रीमती माने वंदना शिवराम (बृहन्मुंबई ते ठाणे शहर), भामरे अविनाश भगवान (बुलढाणा ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), खेडकर हरिष दत्‍तात्रय (औरंगाबाद, ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), संपते प्रशांत पांडुरंग (पोप्रके, बाभळगाव, लातूर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), जाधव विजय कृष्णराव (मओप, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), वाघमारे रूपचंद मधुकर (मओअ, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग...