यशस्वी होण्यासाठी महापुरुषांची चरित्रे वाचा – डॉ. खेडकर

पिंपरी (लोकमराठी) : ज्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे त्या क्षेत्रातील यशस्वी झालेल्या महापुरुषांची चरित्रे वाचली पाहिजेत. त्यांचा आदर्श घेवून वाटचाल करावी. असे मत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे उपकुलपती तथा उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांनी दिला.

म्हेत्रे वस्ती-चिखली येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने समाजसेवक श्रीनिवास राठी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. 

यावेळी प्रकाश दिलपाक यांना समाज गौरव पुरस्कार,साधना चव्हाण व पल्लवी कांबळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अखिल भारतीय धनगर समाज प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, शिवाजी घोडे, हनुमंत म्हेत्रे, अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकट वाघमोडे, उपाध्यक्ष मोहन देवकाते आदी उपस्थित होते.

डॉ. खेडकर पुढे म्हणाले कि, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अहंकार सोडावा, आत्मविश्वास बाळगा,आणि आई वडिलांचा आदर करा व देवावर विश्वास ठेवा.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना आव्हाड यांनी तर आभार साधना यांनी मानले.

One thought on “यशस्वी होण्यासाठी महापुरुषांची चरित्रे वाचा – डॉ. खेडकर

Comments are closed.