GOOD WORK|रोटरी क्लबने भागविली सावळागावाची तहान

रोटरी क्लब ऑफ़ निगडी आणि पुजा कास्टींग यांच्या वतीने सावळा येथे उभारण्यात आलेल्या सौर उर्जा पंपाचे लोकार्पण प्रसंगी अनिल कुलकर्णी, विजय काळभोर, रवींद्रआप्पा भेगडे आदी


पुणे (लोकमराठी) : रोटरी क्लब ऑफ़ निगडीच्या वतीने पुजा कास्टिंग चाकण आणि मावळ प्रबोधिनी यांच्या सहकार्याने दुर्गम भागातील सावळा गावामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांना शेती व पिण्यासाठी सौर ऊर्जा संचलित २० एचपी मोटारच्या साहाय्याने जलसिंचन प्रकल्प उभारला आहे.यामुळे सावळागावाला मुबलक पाणी उपलब्ध केल्याने (ता मावळ) नागरीकांची तहान भागावली.


या प्रकल्पाच्या उदघाटन व लोकार्पण प्रसंगी क्लबचे अध्यक्ष विजय काळभोर, सचिव प्रणीता अलूरकर, डॉ. प्रवीण घाणेगावकर, पुजा कास्टिंगचे संचालक अनिल कुलकर्णी, पुजा कास्टींगचे संचालक संकेत कुलकर्णी, राहुल रांका, दक्षेंद्र आगरवाल, जयश्री कुलकर्णी,
केशव मनगे, गुरूदीपसिंग भोगल, हरिश्चंद्र उडगे, संजीव अलूरकर, साधना काळभोर, रमा मनगे, मावळ प्रबोधिनीचे रवींद्र भेगडे, कमल कौर आदी उपस्थित होते. 

काळभोर म्हणाले कि, एकूण २८ लाखाचा हा प्रकल्प असून यापैकी २० लाख रुपये पुजा कास्टिंग ने सीएसआर फंडातून दिले. पुजा कास्टिंग च्या मदतीने ठोकळवाडी धरण ते सावळागाव सुमारे २ किलो मीटर अंतराची पाईप लाईन टाकण्यात आली. यामुळे सुमारे ६० एकर जमीन बारामाही ओलिताखाली येणार आहे.या जलसिंचन प्रकल्पा साठी २० पॉवर हॉर्स ची मोटार बसवन्यात आली आहे. अंदर मावळ भागात केवळ ४ महिने पाऊस असल्याने फक्त भाताची शेती केली जाते.वर्षभर नगदी पीक घेता येणार आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.रोजगार उपलब्ध होईल. येथील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचवणार आहे.

One thought on “GOOD WORK|रोटरी क्लबने भागविली सावळागावाची तहान

Comments are closed.