चेहरा तजेलदार करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा, होईल खूप फायदा !

चेहरा तजेलदार करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा, होईल खूप फायदा !

लोकमराठी : त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास स्किन रुक्ष आणि काळवंडते. वातावरणातील बदलामुळे त्वचेची चमक कमी होते आणि चेहरा सुकलेला दिसतो. चेहर्‍याची कांती कायम ठेवणारे काही खास घरगुती आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

1. पोट साफ असेल तर त्वचेची समस्या निर्माण होत नाही. चेहर्‍यावर पिंपल्स, डाग होत नाहीत. त्वचा स्वस्थ ठेवण्यासाठी बद्धकोष्ठता दूर करणे आवश्यक आहे. पोट साफ करण्यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध टाकून पाणी प्यावे. या उपायाने पिंपल्सची समस्या दूर होईल.

2. दोन छोटे चमचे डाळीच्या पिठामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून मिश्रण तयार करून घ्या. त्यानंतर या मिश्रणामध्ये दहा थेंब गुलाबपाणी आणि दहा थेंब लिंबाचा रस टाका.या मिश्रणाचा लेप चेहर्‍यावर लावून थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने त्वचा उजळ होण्यास मदत होईल.

3. जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे. दररोज कमीत कमी दहा ग्लास पाणी प्यावे, कारण पर्याप्त प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा स्वस्थ, चमकदार होते. जास्त पाणी प्यायल्यास कमी वयात त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.

4. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. स्ट्रॉबेरी बारीक करून चेहर्‍यावर लावल्यास, चेहरा उजळ होईल.

5. केळीमध्ये मध मिसळून हे मिश्रण चेहर्‍यावर 10 मिनिट लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने त्वचेही कांती कायम राहील.

6. संत्र्याची साल वाळवून चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये थोडेसे कच्चे दुध मिसळून हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. थोड्यावेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा कोमल होईल.

7. पिकलेल्या पपईतील गर चेहर्‍यावर लावून हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

8. तुमची स्किन खूप ड्राय असेल तर एक लहान चमचा साय घेऊन त्यामध्ये थोडेसे केशर मिसळा. या मिश्रणाने चेहर्‍यावर मालिश करा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने चेहर्‍यावरील कोरडेपणा दूर होईल.

9. एक चमचा मधामध्ये एक चमचा पाणी मिसळून हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

10. काजू त्वचेसाठी उत्तम मानले जातात. काजू दुधात भिजवून बारीक कुटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. स्किन ड्राय असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती आणि मधाचे काही थेंब टाकून स्क्रब करा.

11. अर्धा चमचा संत्र्याच्या रसामध्ये ४-5 थेंब लिंबाचा रस, अर्धा चमचा मुलतानी माती, अर्धा चमचा चंदर पावडर आणि चार थेंब गुलाबपाणी टाकून हे मिश्रण थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर हे मिश्रण १५-२० मिनिट चेहर्‍यावर लावून थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

12. मुलतानी मातीमध्ये दही आणि पुदिन्याच्या पानांचे चूर्ण मिसळून घ्या. त्यानंतर हे मिश्रण अर्धा तास चेहर्‍यावर लावून ठेवा. वाळल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. हा उपाय तेलकट त्वचेसाठी लाभदायक आहे.