जेवणानंतर खा छोटासा गुळाचा तुकडा, होतील ‘हे’ फायदे…

जेवणानंतर खा छोटासा गुळाचा तुकडा, होतील 'हे' फायदे…

लोकमराठी : अनेक लोक गुळ फक्त हिवळ्यातच खातात. हे जास्त खाल्ले तर दुष्परिणाम होईल हा विचार करुन गुळ खुप कमी प्रमाणात सेवन केला जातो. गुळ हा उष्ण पदार्थ आहे.

गुळ प्रत्येक ऋतूत खाल्ला जाऊ शकते आणि जुना गुळ नेहमी औषधीच्या स्वरुपात काम करतो. आयुर्वेदाप्रमाणे गुळ लवकर पचतो. हा रक्त आणि भूक वाढवणारा पदार्थ आहे. याव्यतिरिक्त गुळापासुन तयार केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आजार दूर होतात.गुळामध्ये 59.7 टक्के सुक्रोज, 21.8 टक्के ग्लूकोज, 26 टक्के खनिज आणि 8.86 टक्के जल असते. याव्यतिरिक्त गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह आणि ताम्र तत्त्व देखील उपलब्ध असतात. यामुळे तुम्ही प्रत्येक ऋतूत गुळ खात नसला तरी हिवाळ्यात गुळ अवश्य खा.

आपण पाहूया हिवाळ्यात रोज गुळ खाण्याच्या फायद्यांविषयी…

1. हे सेलेनियमसोबत एका अँटीऑक्सीडेंटच्या रुपात काम करते. गुळामध्ये मध्यम प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फोरस आणि झिंक असते. याच कारणामुळे याचे नियमित सेवन केल्याने इम्युनिटी पावर वाढते. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. यामुळे हे बॉडीला रिचार्ज करते. यासोबतच हे खाल्याने थकवा दूर होतो.

2. गुळ आणि काळ्या तिळाचे लाडू खाल्ल्याने हिवाळ्यात दमा आणि सर्दीचा त्रास होत नाही. नियमित गुडचे सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी नियमित गुळाचे सेवन केले पाहिजे. यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

3. गुळाचा हलवा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. हे शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर काढते. हिवाळ्यात हे शरीरातील तापमानाला नियंत्रिक करण्याचे काम करते. यासोबतच हे खाल्ल्याने मुलींच्या पीरियड्सच्या समस्या देखील दूर होतात.

4. जर तुम्ही गॅस आणि अ‍ॅसिडीटीने त्रस्त असाल तर जेवणानंतर गुळ अवश्य खा. असे केल्याने या दोन्हीही समस्या दूर होतील. गुड आणि काळे मीठ चाटून खाल्ल्याने आंबट ढेकर येणे बंद होते.

5. हिवाळ्यात अनेक लोकांना कान दुखण्याची समस्या होते. अशात कानात मोहोरीचे तेल टाकावे आणि गुड, तुप मिक्स करुन खावे, असे केल्याने कान दुखीची समस्या दूर होईल.