लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने प्रमाणपत्र देवून पोलिस पाटिल, पोलीस मित्र, सिक्युरिटी एनएसएस विद्यार्थ्यांचा सन्मान
लोणावळा, दि.१३ (लोकमराठी) - लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने प्रमाणपत्र व पुष्पगुष्छ देवून हॉटेल चंद्रलोक येथे पोलिस पाटिल, पोलीस मित्र, सिक्युरिटी एनएसएस विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.
पोलीस पाटील हा गाव पातळीवरचा एक महत्त्वाचा कणा आहे. प्रामुख्याने गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था, शांतता प्रस्थापित करण्याचे काम पोलीस पाटील करीत असतो. गाव पातळीवर कोणतेही काम असू दे सेवेसाठी सदैव तत्पर असणारा पोलीस पाटील असतो. म्हणून अशा पोलीस पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी (आयपीएस) सत्य साई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या वतीने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील व पोलीस मित्र यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस पाटील संजय जाधव,पोलीस पाटील शहाजहान इनामदार,पोलीस पाटिल ह.भ.प अनंता श...