
पुणे (लोकमराठी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून आतापर्यंत पुणे पोलिसांकडे व्हॉटस अॅप हॅक झाल्याच्या पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी या संदर्भात अर्लट जारी केले आहे. विशेष म्हणजे या पाचही तक्रारी महिलांकडूनच दाखल करण्यात आलेल्या आहेत.
या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सायबर सेलचे उपायुक्त संभाजी कदम यांनी शनिवारी या संदर्भात अर्लट जारी केले. तसेच, नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये तसेच व्हॉट्स अॅप किंवा अन्य सोशल मीडियावर आलेल्या एखाद्या संशयीत लिंकवर क्लिक देखील करू नये, असे आवाहनही केले आहे.

लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून आमच्याकडे व्हॉटस अॅप हॅक झाल्याच्या पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यार्थीनी, गृहिणी आणि आयटी क्षेत्रातील काम करणाऱ्यांचा समावेश आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांचे व्हॉटस अॅप अकाउनंट हॅक केले व त्यांना ब्लॅकमेल करणे सुरू केले आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले आहे.
फेसबुक, व्हॉटस अॅप यासारख्या सोशल माध्यमांवर सध्या सर्वाधिक नागरिक सक्रिय आहे. दरम्यान काही कंपनी व गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून नागरिकांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोबाईलवर मेसेज करून ओटीपी नंबर मागितला जात आहे. त्यातून संबधित व्यक्तीची सर्व माहिती मिळवली जात आहे व त्यातूनच फसवणुकीच्या घटना पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
- या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
- सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
- पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती
- आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे