Tag: pune police

जुन्रर परिसरात घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी
पुणे

जुन्रर परिसरात घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

पुणे, दि ७ (लोकमराठी) - जुन्नर परिसरात दशक्रिया विधीसाठी घरातील लोक बाहेर गेल्याचा फायदा घेवुन घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करत ५ लाख ४६ हजार ४८१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आकाश प्रकाश विभुते (वय ३२ वर्षे, सुपली, पो. पळशी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, सध्या रा. फुलसुंदर अपार्टमेंट, आनंदवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे या सरईत गुन्हेगाराचे नाव आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्हात वाढत्या घरफोडयाचे प्रमाण लक्षात घेवुन पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना घरफोड्यांबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. स्थानिक ग...
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वतीने गौरव
पुणे

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वतीने गौरव

पुणे, दि.१५ (लोकमराठी) - उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचा विशेष पोलीस महानिरीक्षक(IG) कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांच्या वतीने गौरवण्यात आले. गेल्या वर्षभरामध्ये आंबेगाव तसेच जुन्नर तालुक्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.काबाड कष्ट करून सामान्य माणूस हप्ते भरून मोटारसायकल विकत घेत असतात त्यातच अश्या प्रकारे गाड्या चोरीला गेल्याने नागरिक त्रस्त होते. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोहीम राबवून सदर भागामध्ये अश्या गुन्ह्यामध्ये संशयित असलेल्या इसमांची धरपकड स्थानिक गुन्हे शाखे मार्फत करण्यात आली. अखेर मार्च महिन्यामध्ये तब्बल १०/१२ आरोपी पकडून त्यांच्याकडून सुमा...
खंडणी, अवैध सावकारी प्रकरणी अनिकेत हजारे आणि नाना वाळकेला अटक
पुणे, मोठी बातमी

खंडणी, अवैध सावकारी प्रकरणी अनिकेत हजारे आणि नाना वाळकेला अटक

सावकार नानासाहेब गायकवाड विरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे आरोपींचा फिर्यादीलाच अडकवण्याचा डाव उघड पुणे : औंधमधील आणखी एका हाय प्रोफाईल प्रकरणावर चतु:श्रृंगी पोलिसांनी सावकारी आणि खंडणी प्रकरणी कारवाई करुन अटक केली आहे. रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय ३७ रा. जय गणेशनगर, विधातेवस्ती, औंध) आणि त्याचा साथीदार अनिकेत रमेश हजारे (वय 35, रा. ए/31 हजारे सदन, लुंकड हॉस्पिटलजवळ, दापोडी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते १० डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. बेकायदेशीररित्या सावकारी पद्धतीने पैसे देवून अवास्तव पद्धतीने व्याज आकारणी करत तसेच खंडणी मागत ती न दिल्यास सामाजिक बदनामी व मानसिक छळ केल्याप्रकरणी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे स्वप्नील बालवडकर (रा. बालेवाडी) यांनी तक्रार केली होती. त्यानूसार वाळके आणि हजारे यांच्या विरोधात चतु:श्रृंगी ...
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जुनेजा यांच्यावर गुंडाकडून जीवघेणा हल्ला
पिंपरी चिंचवड

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जुनेजा यांच्यावर गुंडाकडून जीवघेणा हल्ला

जितेंद्र जुनेजा पिंपरी चिंचवड : " काय बघतोय माझ्याकडे,तू खूपच अर्ज देत असतो , तुला आज खल्लास करतो " असे म्हणत गुंडाने सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र जुनेजा यांच्यावर अज्ञात वस्तूने जीवघेणा हल्ला केला . ही घटना शुक्रवारी (दिनांक 23 एप्रिल) सकाळी पिंपरीतील शास्त्रीनगर मधे घडली. याप्रकरणी गुंडा विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विकी शर्मा असे गुंडाचे नाव असून त्याची परिसरात दहशत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जुनेजा सकाळी नऊच्या सुमारास खरेदीसाठी गुरुद्वार रोड कडे जात होते, त्यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या गुंड विकी शर्मा याने त्यांच्यावर " तू खूप अर्ज करत असतो, तू काय करतो माहित आहे , तुला आज खल्लास करतो".असे म्हणत डोक्यावर ,पाठीवर व पोटात अज्ञात वस्तूने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेेच गट्टू मारण्यास उचलला मात्र त्याच्या तावडीत...
धक्कादायक : पुण्यात दुधाच्या टेम्पोतून दारूची वाहतूक
पुणे

धक्कादायक : पुण्यात दुधाच्या टेम्पोतून दारूची वाहतूक

पुणे (लोकमराठी) : लॉकडाऊनमुळे संयम सुटलेल्या तळीरामांनी दारुसाठी बीअर बारची दुकाने फोडून दारुच्या बाटल्या पळवल्याच्या घटना ताज्या असतानाच पुण्यात चक्क दुधाच्या टेम्पोतून दारुची ने-आण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका पोलिसाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून टेम्पोच्या चालकाला जेरबंद करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. पोलिसांच्या गस्तीही वाढवण्यात आल्या आहेत. पुण्यातील कात्रज घाटातही काल रात्रीपासून आज सकाळी ७ वाजेपर्यंत नाकाबंदी सुरू होती. काल रात्री साडे अकरा वाजता 10MH12 JF6988 या क्रमांकाचा एक टेम्पो घाटातून जाताना पोलिसांना दिसला. त्यामुळे पोलिसांनी या टेम्पो चालकाला थांबायला सांगितले आणि त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी टेम्पोचालकाच्या बोलण्यावर पोलिसाला संशय आल्याने त्याला टेम्पो उघडून दाखविण...
PUNE : पुण्यात व्हॉट्सप हॅक झाल्याच्या तक्रारींनंतर पोलिसांकडून अर्लट जारी
पुणे, मोठी बातमी

PUNE : पुण्यात व्हॉट्सप हॅक झाल्याच्या तक्रारींनंतर पोलिसांकडून अर्लट जारी

पुणे (लोकमराठी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून आतापर्यंत पुणे पोलिसांकडे व्हॉटस अ‍ॅप हॅक झाल्याच्या पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी या संदर्भात अर्लट जारी केले आहे. विशेष म्हणजे या पाचही तक्रारी महिलांकडूनच दाखल करण्यात आलेल्या आहेत. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सायबर सेलचे उपायुक्त संभाजी कदम यांनी शनिवारी या संदर्भात अर्लट जारी केले. तसेच, नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये तसेच व्हॉट्स अ‍ॅप किंवा अन्य सोशल मीडियावर आलेल्या एखाद्या संशयीत लिंकवर क्लिक देखील करू नये, असे आवाहनही केले आहे. लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून आमच्याकडे व्हॉटस अ‍ॅप हॅक झाल्याच्या पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यार्थीनी, गृहिणी आणि आयटी क्षेत्रातील काम करणाऱ्यांचा सम...