सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जुनेजा यांच्यावर गुंडाकडून जीवघेणा हल्ला

पिंपरी चिंचवड : ” काय बघतोय माझ्याकडे,तू खूपच अर्ज देत असतो , तुला आज खल्लास करतो ” असे म्हणत गुंडाने सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र जुनेजा यांच्यावर अज्ञात वस्तूने जीवघेणा हल्ला केला . ही घटना शुक्रवारी (दिनांक 23 एप्रिल) सकाळी पिंपरीतील शास्त्रीनगर मधे घडली. याप्रकरणी गुंडा विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विकी शर्मा असे गुंडाचे नाव असून त्याची परिसरात दहशत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जुनेजा सकाळी नऊच्या सुमारास खरेदीसाठी गुरुद्वार रोड कडे जात होते, त्यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या गुंड विकी शर्मा याने त्यांच्यावर ” तू खूप अर्ज करत असतो, तू काय करतो माहित आहे , तुला आज खल्लास करतो”.असे म्हणत डोक्यावर ,पाठीवर व पोटात अज्ञात वस्तूने मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेेच गट्टू मारण्यास उचलला मात्र त्याच्या तावडीतून जितेंद्र जुनेजा यांनी कसेबसे स्वतःची सुटका केली. या हल्ल्यामध्ये जुनेजा यांच्या डोक्याला, मानेला व पोटात जबर मुक्का मार बसला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .

दरम्यान पोलिसांकडे तक्रार केली , तरीही पोलीस माझे वाकडे करणार नाही अशी धमकीही विकी शर्मा यानी जितेंद्र जुनेजा यांना दिली.

या हल्ल्याचा परिसरातील नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी निषेध केला असून या गुंडावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.