या भाईची पोलीसांनी मस्ती उतरवली | हात जोडून मागितली माफी
पिंपरी : थेरगाव क्वीनसोबत अश्लील भाषा आणि धमकीचे रील बनवणारा तिचा मित्र कुणाल राजू कांबळेला पिंपरी सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल हा साक्षीसह इंस्टाग्रामवरील रील बनवायचा. याअगोदर साक्षी हेमंत श्रीश्रीमल (१८) आणि साक्षी राकेश कश्यप (१८) यांना अटक करण्यात आली होती. तिघांवर कलम २९२, २९४, ५०६, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://youtu.be/FqUzC63XV1A
गेल्या काही दिवसांपासून अश्लील भाषा वापरून आणि इंस्टाग्रामवर धमकीचे रील बनवणाऱ्या थेरगाव क्वीनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मात्र, त्यांचा साथीदार मित्र कुणाल हा फरार होता. त्याला पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आलं अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिली.
थेरगाव क्वीनचे ४१ हजार फॉलोअर्स असून ते अधिक वाढवण्याच्या प्र...