मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचा पदाधिकारी सहकाऱ्यांसह २५ लाखाच्या खंडणीप्रकरणी अटक

मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचा पदाधिकारी सहकाऱ्यांसह २५ लाखाच्या खंडणीप्रकरणी अटक

पिंपरी : एका दुकानदाराकडे २५ लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचा पदाधिकारी व त्याच्या सहकाऱ्यांना विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन एकुण सात जणांना वाकड पोलीसांनी अटक केली आहे.

हेमंत निवगुणे, कपिल राक्षे, आदित्य जेधे, तानाजी मस्तुद, किरण घोलप, सतीश केदारी, ज्योस्त्ना पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सुरजाराम रुपाराम चौधरी (वय ३७, रा. राव कॉलनी, प्लॉट नं. , रो. हाऊस नं. ०५, भंडारी हॉस्पिटल जवळ, तळेगाव दाभाडे, मुळगावराजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे रामनगर राहटणी येथे बालाजी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. शुक्रवारी (ता.१०) सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपी सतीश केदारी आणि त्याचे अन्य सहकारी चौधरी यांच्या दुकानात आले. आम्ही मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी आहोत. तुम्ही भेसळयुक्त व ड्युब्लीकेट मालाची विक्री करता. तुम्हांला व तुमच्या भावाला 10 वर्षासाठी तुरुंगात पाठवु. अशी धमकी देत 25 लाख रुपयांची मागणी केली. दरम्यान, आरोपी हेमंत निवगुणे आणि ज्योत्स्ना पाटील यांनी चौधरी यांना धमकावुन त्यांच्या भावाच्या खिशातुन रोख रक्कम आठ हजार ५०० रुपये देण्यास भाग पाडले.

आरोपी सीसी फुटेज मध्ये कैद

तुमच्या दुकानात तुम्ही ड्युब्लीकेट मालाची विक्री करीत आहात. आम्ही तुमच्यावर आणि तुमच्या भावावर कारवाई करणार आहोत. तुम्हांला १० वर्षासाठी तरी तुरुंगात पाठविणार आहोत. हे नको असेल तर आम्हांला २५ लाख रुपये द्या. अशी मागणी या आरोपींनी दुकानदार चौधरी यांच्याकडे केली होती. घाबरलेले चौधरी यांनी पोलीसांकडे धाव घेतली. सर्व प्रकार पोलीसांना सांगितल्यानंतर पोलीसांनी आरोपींकडे या प्रकाराबाबत विचारणा केली असता ‘ तो मी नव्हेच ’ अशा अविर्भावात हि मंडळी पोलीसांशी संभाषण करीत होती. मात्र, पोलीसांनी चौधरी यांच्या दुकानातील सीसी टिव्ही फूटेज तपासले असता सर्व खरा प्रकार उघड झाला. पैशाची मागणी करताना सर्व आरोपी कॅमेरात कैद झाले आणि खंडणीखोरांचा खेळ संपला.

मुख्य आरोपी आरपीआय संघटनेचा पदाधिकारी

या प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश केदारी हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड संघटनेचा सक्रिय पदाधिकारी आहे. यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध बेकायदा आंदोलन करणे तसेच चेक बाऊंस करणे अशा प्रकारचे अन्य सात ते आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती विश्वासणीय सुत्रांकडुन मिळाली आहे. पक्षाचा पदाचा गैरवापर करुन काही महिला व पुरुष कार्यकर्त्यांना हाताशी धरुन धनदांडगे तसेच व्यापारी वर्ग यांच्याकडे पैशाची मागणी (खंडणी) करीत असल्याची देखील खात्रीशीर माहिती प्राप्त होत आहे.

दुकानदारावर देखील कारवाई?

आरोपींनी दुकानदारावर केलेले आरोप यामध्ये काही तथ्य आहे का ? याबाबत वाकड पोलीस तपास करीत आहेत. अन्न धान्य प्रशासनाकडुन अहवाल आल्यानंतर दुकानदारावर देखील पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

ब्रेकींग न्युज द्यायला आला नी अटक झाला

आरोपी सतीश केदारी याने प्रसार माध्यमांतील काही मंडळींना सोबत घेवुन तुम्हांला ब्रेकींग न्युज देतो. असे सांगत आपल्या सोबत पोलीस ठाण्याच घेवुन आला होता. पोलीसांना देखील त्याने फोन करुन घटनास्थळी बोलावले. मात्र, पोलीसांनी घटनास्थळावरील परस्थितीजन्य पुरावा पाहता, तक्रार करणारे निघाले आरोपी निघाल्याने पत्रकार ज्या नेत्याची बातमी कव्हर करण्यासाठी आले होते. तो नेता आरोपीच्या पिंजऱ्यात अडकलेला पाहता सर्वांनी हळुच काढता पाय घेणे पसंत केले.