वाकडमध्ये गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था – विशाल वाकडकर

वाकडमध्ये गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था - विशाल वाकडकर
  • द्रौपदा मंगल कार्यालय वाकड येथील खासगी जागेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने मोफत सुविधा

पिंपरी : कोरोना कोविडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखिल गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यानुसार गणेश मुर्ती विसर्जनासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी वाकड परिसरातील नागरीकांसाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. याठिकाणी भाविकांना गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी, तसेच मुर्ती दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

https://youtu.be/QyGFUwhfnrY

भाविकांनी नदी, नाला, ओढ्यात, विहीरीत मुर्ती विसर्जन करुन पर्यावरणास हानी पोहचवू नये. पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने वाकड येथील द्रौपदा लॉन मंगल कार्यालयातील खासगी जागेत हा तलाव करण्यात आला आहे. यासाठी आरतीची व्यवस्था, निर्माल्य दान व्यवस्था, प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे.

सदर कृत्रिम तलाव मंगळवार (14 सप्टेंबर) पासून खुला करण्यात येणार आहे. सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत येथे मुर्ती विसर्जन करता येईल. येथे येणा-या सर्व भक्त भाविकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, मास्क वापरावा आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन संयोजक विशाल वाकडकर यांनी केलेले आहे.