Tag: Wakad Police

मनसे महिला उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड | वाकड पोलिसांत गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

मनसे महिला उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड | वाकड पोलिसांत गुन्हा दाखल

https://youtu.be/fVNe0wIKhdI पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या चारचाकी वाहनाची आज (गुरुवारी) पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने तोडफोड केली. या घटनेमुळे काळेवाडी तसेच शहरातील मनसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून काळेवाडी परिसरातही चांगलीच खळबळ उडाली आहे. या तोडफोडीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी तीन अज्ञात हल्लेखोरांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनिता पांचाळ यांचे चारचाकी वाहन काळेवाडी येथील पाचपीर चौक येथे त्यांच्या राहत्या घराजवळ पार्क करण्यात आली होती. पहाटे चार ते सव्वाचारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी कोयत्याच्या सहाय्याने पांचाळ यांच्या गाडीवर वार करीत गाडीच्या काचा फोडल्या. ही घटना कळता...
मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचा पदाधिकारी सहकाऱ्यांसह २५ लाखाच्या खंडणीप्रकरणी अटक
पुणे, मोठी बातमी

मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचा पदाधिकारी सहकाऱ्यांसह २५ लाखाच्या खंडणीप्रकरणी अटक

पिंपरी : एका दुकानदाराकडे २५ लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचा पदाधिकारी व त्याच्या सहकाऱ्यांना विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन एकुण सात जणांना वाकड पोलीसांनी अटक केली आहे. हेमंत निवगुणे, कपिल राक्षे, आदित्य जेधे, तानाजी मस्तुद, किरण घोलप, सतीश केदारी, ज्योस्त्ना पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सुरजाराम रुपाराम चौधरी (वय ३७, रा. राव कॉलनी, प्लॉट नं. , रो. हाऊस नं. ०५, भंडारी हॉस्पिटल जवळ, तळेगाव दाभाडे, मुळगावराजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे रामनगर राहटणी येथे बालाजी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. शुक्रवारी (ता.१०) सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपी सतीश केदारी आणि त्याचे अन्य सहकारी चौधरी यांच्या दुकानात आले. आम्ही मानवाधिकार व भ्रष्टाचार नि...
महिलांचे खरे रक्षक पोलिसच असल्याने मनसे महिला आघाडीतर्फे पोलिसांना रक्षाबंधन
पिंपरी चिंचवड, सामाजिक

महिलांचे खरे रक्षक पोलिसच असल्याने मनसे महिला आघाडीतर्फे पोलिसांना रक्षाबंधन

वाकड : महिलांचे खरे रक्षक हे पोलिसच आहेत, असा पोलिसांप्रती आदर व्यक्त करत राखी पौर्णिमेनिमित्त वाकड पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. त्यावेळी वाकड पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संभाजी जाधव, संतोष पाटील व विजय घाडगे आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ, अनिता नाईक, काजल गायकवाड, अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल धस, नितिन जाधव, मनसे वाहातुक सेनेचे विशाल साळुंके इत्यादी या उपक्रमात सहभागी झाले होते. ...