महिलांचे खरे रक्षक पोलिसच असल्याने मनसे महिला आघाडीतर्फे पोलिसांना रक्षाबंधन

महिलांचे खरे रक्षक पोलिसच असल्याने मनसे महिला आघाडीतर्फे पोलिसांना रक्षाबंधन

वाकड : महिलांचे खरे रक्षक हे पोलिसच आहेत, असा पोलिसांप्रती आदर व्यक्त करत राखी पौर्णिमेनिमित्त वाकड पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

त्यावेळी वाकड पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संभाजी जाधव, संतोष पाटील व विजय घाडगे आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ, अनिता नाईक, काजल गायकवाड, अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल धस, नितिन जाधव, मनसे वाहातुक सेनेचे विशाल साळुंके इत्यादी या उपक्रमात सहभागी झाले होते.