Tag: mns

एका स्वप्नभंगाचा वाढदिवस आणि महाराष्ट्राला तिसऱ्या पर्यायाची गरज
राजकारण, मोठी बातमी

एका स्वप्नभंगाचा वाढदिवस आणि महाराष्ट्राला तिसऱ्या पर्यायाची गरज

हेरंब कुलकर्णी आज मनसेचा वर्धापन दिन साजरा होतो आहे. मनसे ज्या दिवशी स्थापन झाली, तो दिवस अजूनही आठवतो आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी तरुणांना एक स्वप्न राज ठाकरेंनी दाखवले. खेड्यापाड्यातून शिवाजी पार्कला गाड्या भरून गेल्या होत्या आणि डोळ्यात लकाकी घेऊन खेड्यापाड्यातली मुले गावाकडे आली होती. १३ आमदार निवडून आल्यावर त्या स्वप्नाला धुमारे फुटले आणि पुढे व्हाया मोदी, व्हाया पवार, व्हाया फडणवीस असा आजपर्यंतचा प्रवास समोर आहे. असेच स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवले होते. अशाच खेड्यापाड्यातून तरुणांच्या गाड्या भरून गेल्या होत्या. काँग्रेसमधून ते बाहेर आले याचा अर्थ कॉंग्रेसची सरंजामदारी संस्कृती दूर करतील आणि नवी राजकीय संस्कृती देतील असे वाटले होते पण सारे सहकार सम्राट शिक्षण सम्राट घराणेशाही सम्राट त्यांच्यामागे आले आणि काँग्रेसची भ्रष्ट आवृत्तीच हा पक्ष म्हणून समोर आला. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शितल सुर्यवंशी, चेतना सातवंडे, मेघा शिंदे, विजया घाटके यांनी पटकावला प्रथम क्रमांक पिंपरी : कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर शासनाचे अनेक निर्बंध होते. त्यामुळे कोणतेही सण-उत्सव साजरा केले गेले नाहीत. मात्र, कोरोनाचे सावट कमी झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घरगुती गौरी-गणपती सजावट, रांगोळी व मेहंदी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच काळेवाडीत पार पडला. त्यावेळी कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, विद्युत कर्मचारी, गॅस वितरण करणारे डिलेव्हरी बॉय व पत्रकारांचा कोविड योध्दा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते, शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेविका अश्विनी चिखले, महिला शहराध्यक्षा अश्विनी बांगर, विद्यार्थी सेना श...
महिला अत्याचार निषेधार्थ मनसेचे पिंपरीत आंदोलन
पिंपरी चिंचवड, राजकारण

महिला अत्याचार निषेधार्थ मनसेचे पिंपरीत आंदोलन

पिंपरी : राज्यभरात महिलांवर वारंवार घडत असलेल्या अत्याचाराविरोधात नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला सेना शहराध्यक्षा अश्विनी बांगर, शहर सचिव सीमा बेलापुरकर, उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ, स्नेहल बांगर, संगिता देशमुख, विद्या कुलकर्णी, वैशाली बोत्रे, वैशाली कोराटे, अनिता नाईक, श्रद्धा देशमुख, संगीता कोळी, काजल गायकवाड, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, के के कांबळे, आकाश लांडगे, रोहित थरकुडे, किरण वाघेरे, वाहतूक सेना अध्यक्ष सुशांत साळवी, कर्मचारी सेना अध्यक्ष रूपेश पटेकर, विशाल सालूंखे, विशाल मानकरी, राजू भालेराव, राजेश अवसरे, परमेश्वर चिल्लरगे, नारायण पठारे, अलेक्सझांडर आप्पा मोझेस, नाथा शिंदे, स...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा
पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ व २२ मधील नागरिकांसाठी घरगुती गणपती सजावट स्पर्धा, गौरी गणपती सजावट स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढले जाणार असून सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा काळेवाडीतील बी. टी. मेमोरियल शाळेत रविवारी (ता. २६ सप्टेंबर) होणार आहे. या स्पर्धेचे संयोजन मनसे पिंपरी विधानसभा उपविभाग अध्यक्ष आकाश लांडगे व शहर उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांनी केले आहे. ...
महिलांचे खरे रक्षक पोलिसच असल्याने मनसे महिला आघाडीतर्फे पोलिसांना रक्षाबंधन
पिंपरी चिंचवड, सामाजिक

महिलांचे खरे रक्षक पोलिसच असल्याने मनसे महिला आघाडीतर्फे पोलिसांना रक्षाबंधन

वाकड : महिलांचे खरे रक्षक हे पोलिसच आहेत, असा पोलिसांप्रती आदर व्यक्त करत राखी पौर्णिमेनिमित्त वाकड पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. त्यावेळी वाकड पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संभाजी जाधव, संतोष पाटील व विजय घाडगे आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ, अनिता नाईक, काजल गायकवाड, अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल धस, नितिन जाधव, मनसे वाहातुक सेनेचे विशाल साळुंके इत्यादी या उपक्रमात सहभागी झाले होते. ...
राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती कुठून आली?; अंजली दमानिया यांचा सवाल
महाराष्ट्र, मोठी बातमी

राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती कुठून आली?; अंजली दमानिया यांचा सवाल

मुंबई (लोकमराठी) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहे. या चौकशीची वेळ चुकीची असल्याचे मत दमानिया यांनी व्यक्त केले आहे. मात्र त्याचवेळी ही चौकशी याआधीच व्हायला हवी होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. तसचं राज ठाकरे यांच्या कमाईचे साधन काय?, त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? असा सवालही त्यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांची चौकशी २२ तारखेला म्हणजेच आज होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाल्यानंतर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे सकाळपासूनच मुंबईमधील अनेक महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तामध्ये राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित यांच्या सोबत पावणे अकराच्या सुमारास कृष्णकुंजवरुन ईडी...