महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ व २२ मधील नागरिकांसाठी घरगुती गणपती सजावट स्पर्धा, गौरी गणपती सजावट स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढले जाणार असून सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा काळेवाडीतील बी. टी. मेमोरियल शाळेत रविवारी (ता. २६ सप्टेंबर) होणार आहे. या स्पर्धेचे संयोजन मनसे पिंपरी विधानसभा उपविभाग अध्यक्ष आकाश लांडगे व शहर उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांनी केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा