महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • शितल सुर्यवंशी, चेतना सातवंडे, मेघा शिंदे, विजया घाटके यांनी पटकावला प्रथम क्रमांक

पिंपरी : कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर शासनाचे अनेक निर्बंध होते. त्यामुळे कोणतेही सण-उत्सव साजरा केले गेले नाहीत. मात्र, कोरोनाचे सावट कमी झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घरगुती गौरी-गणपती सजावट, रांगोळी व मेहंदी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच काळेवाडीत पार पडला. त्यावेळी कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, विद्युत कर्मचारी, गॅस वितरण करणारे डिलेव्हरी बॉय व पत्रकारांचा कोविड योध्दा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते, शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेविका अश्विनी चिखले, महिला शहराध्यक्षा अश्विनी बांगर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, जनहित विभागाचे शहराध्यक्ष राजू भालेराव, विधी विभाग शहराध्यक्षा अॅड. प्रिती सिंह परदेशी, कर्मचारी सेना शहराध्यक्ष रूपेश पटेकर, सीमा बेलापुरकर, संगिता देशमुख, संगिता काटे, विद्या कुलकर्णी, वैशाली कोराटे, संगिता कोळी, अनिता नाईक, वैशाली बोत्रे, किरण वाघेरे, रोहित थरकुडे, अक्षय सोरटे, विनोद काळजे, अभिजित वाघेरे, सीमा परदेशी, श्रद्धा देशमुख, स्नेहल बांगर यांच्यासह सर्व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हे आहेत स्पर्धेतील विजयी

रांगोळी : शितल ज्ञानदेव सुर्यवंशी, कविता जायभाय, साक्षी केंद्रे

मेहंदी : चेतना सातवंडे, आसमा शेख, गिता वंजारे व श्रावणी बोंद्रे

गणपती सजावट : मेघा शेखर शिंदे, रेणुका विनोद पनीकर, सोनल संजय जोगदंड

गौरी : विजया आनंदराव घाटके, माया संतोष पवार, राजश्री नितीन राजे

यावेळी अनुष्का संदिप बोत्रे, तन्वी कैलास पवार यांनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मनसे महिला उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ व पिंपरी विधानसभा उपविभाग अध्यक्ष आकाश लांडगे यांनी संयोजन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद