महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जेष्ठांना मोफत छत्र्या वाटप

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जेष्ठांना मोफत छत्र्या वाटप
  • उन्नती सोशल फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम

पिंपरी सौदागर : येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष कुंदा संजय भिसे यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमूर्तमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वछता अभियान तसेच परिसरातील सुमारे एक हजार जेष्ठ नागरिकांना मोफत छत्र्या वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे जेष्ठांकडून कौतुक करण्यात आले.

लिनियर गार्डन कोकणे चौक येथे ज्येष्ठ नागरिक व सर्व उपस्थित नागरिकांनी स्वछता अभियान उपक्रम राबविला. माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप, हभप ऋषिकेश महाराज चोरगे व समाजसेविका शारदा मुंढे यांच्या हस्ते या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जेष्ठांना मोफत छत्र्या वाटप

यावेळी फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थाचे विलास काटे, शिवशंभो सेवा मंडळ अध्यक्ष संपत मेटे, प्रबोधनकारक समाजसेविका शारदा मुंढे, हभप शेखर काटे, हभप माउली हांडे, बचराज शर्मा, विलास नागरे, भाजप सहसंपर्क प्रमुख उत्तर महाराष्ट्र मनोज ब्राह्मणेकर, सुरेश कुंजीर, तात्या शिनगारे, लायन्स क्लब अध्यक्ष अंजुम सय्यद,भानुदास काटे पाटील, ऑल सिनिअर सिटीजन्स असोशिएशनचे अॅड. शंकरराव पाटील, उन्नती विठाई वाचनालयाचे डॉ. सुभाषचंद्र पवार, श्रमेश वाणी, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जयस्वाल, नवचैतन्य हास्य क्लबचे विलास नगरकर, कोकणे चौक ज्येष्ठ नागरिक संघाचे भगवंतराव झोपे, लिनियर गार्डन ज्येष्ठ नागरिक संघाचे अशोक वारकर, दिलीप नेमाडे, ओम ललवाणी, ओम भट, सखाराम ढाकणे, विष्णुपंत वंटमवार, डॉ. रोकडे, प्रभाकर राऊत, रमेश सोनवणे, राहुल गंगाखेडकर, रमेशचंद्र सारडा, नारखेडे, यशवंतराव शिंदे, शकुंतला शिंदे आदी उपस्थित होते.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जेष्ठांना मोफत छत्र्या वाटप

“कुंदाताईंना नगरसेवकपदाची संधी द्या!”

उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कुंदाताई विविध सेवाभावी उपक्रम राबवित असतात. त्याचा समाजातील प्रत्येक घटकाला लाभ मिळत आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊन काळातही त्या जनतेसाठी कायम मदत करीत होत्या. अशा निरपेक्ष सेवाभावी कार्यकर्त्या असलेल्या कुंदा भिसे यांनी महापालिकेत जनतेचे प्रतिनिधित्व करावे. तसेच जनतेनेही त्यांना नगरसेवका होण्याची संधी द्यावी, अशी भावना जेष्ठ नागरिक शंकरराव पाटील यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप विकास काटे यांनी केले.