Tag: Unnati Foundation

विठाईच्या माध्यमातून वाचन संस्कृतिची जपणूक – कुंदाताई भिसे
पिंपरी चिंचवड

विठाईच्या माध्यमातून वाचन संस्कृतिची जपणूक – कुंदाताई भिसे

उन्नती सोशल फाउंडेशन संचलित विठाई मोफत वाचनालया च्या वतीने जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला पिंपरी, दि, 23 : माहिती व तंत्रज्ञानाच्या (डिजीटल) युगामध्ये पुस्तक वाचन संस्कृती लोप पावताना दिसत आहे. तिची जपणूक करण्यासाठी सर्वांनी पुस्तक वाचनाला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या भागातील वाचक प्रेमींना सहज पुस्तके उपलब्ध व्हावी म्हणून आपण विठाई वाचनालयाच्या माध्यमातून पुस्तक संच उपलब्ध केले. त्याचा शेकडो वाचकांना फायदा होत आहे, असा विश्‍वास उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी व्यक्त केला. पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील उन्नति सोशल फाऊंडेशनच्या विठाई वाचनालयात जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. यावेळीे उन्नतिच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे (Kunda Bhise) यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. लेखिका सौ. अ...
पिंपळे सौदागरमधील सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे यांचा पिंपरी चिंचवड भूषण पुरस्काराने सन्मान
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपळे सौदागरमधील सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे यांचा पिंपरी चिंचवड भूषण पुरस्काराने सन्मान

हा पुरस्कार समाजातील दिनदुबळ्यांच्या चरणी अर्पण करतो; भिसे यांनी व्यक्त केली कृतज्ञता पिंपरी : जनसेवा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेली अनेक वर्ष लोकांची कामे करत आलो. परमेश्वराने दिलेल्या दोन हाताने दिनदुबळ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याच संधीचं सोणं झालं असून हा पुरस्कार त्याचेच प्रतिक आहे. त्यामुळे हा सन्मान पिंपळे सौदागरमधील दिनदुबळ्या, दिव्यांग, अंध-अपंग, ज्येष्ठ, कष्टकरी, कामगार वर्गातील नागरिकांच्या चरणी अर्पण करतो. त्यांनी सेवा करण्याची संधी दिली नसती तर हा सन्मान घेण्याचा योगच आला नसता, अशी भावना उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते संजय उर्फ आबा भिसे यांनी व्यक्त केली. सातारा जिल्हा मित्र मंडळ, सांगली जिल्हा मित्र मंडळ, पश्चिम महाराष्ट्र युवा मंच, साकोसां महिला मंडळ, साकोसां ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संजय उर्फ आबा भिसे या...
उन्नतीच्या वर्धापनदिनानिमित्त सप्ताहभर विधायक उपक्रमांची रेलचेल ; मोफत डोळे तपासणी शिबीरास नागरिकांचा उस्फुर्त सहभाग
पिंपरी चिंचवड, सामाजिक

उन्नतीच्या वर्धापनदिनानिमित्त सप्ताहभर विधायक उपक्रमांची रेलचेल ; मोफत डोळे तपासणी शिबीरास नागरिकांचा उस्फुर्त सहभाग

उन्नतीचा सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, पर्यावरणीय जडणघडणीत सहभाग - कुंदाताई भिसे पिंपरी : पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाउंडेशनच्या (Unnati Social Foundation) ५ व्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ४० मधील नागरिकांसाठी सप्ताहभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. २६) रोजी मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दवा इंडिया या जेनेरिक फार्मसी कंपनीच्या सहकार्याने ग्राहकांच्या मेडिकल बिलांवर येत्या १५ जुलैपर्यंत ९० टक्के सवलत दिली जाणार आहे, या योजनेचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. शिबिरातील सहभागी लाभार्थ्यांची मशीनमधून डोळे तपासणी करण्यात आली. तज्ञांकडून आजाराबाबत सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात आले. अचूक चष्म्याचा नंबर काढून देण्यात आला. यावेळी उन्नति सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदात...
पिंपळे सौदागर परिसरातील रखडलेली कामे त्वरित मार्गी लावा; भाजपाच्या कुंदा भिसे यांची मागणी
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागर परिसरातील रखडलेली कामे त्वरित मार्गी लावा; भाजपाच्या कुंदा भिसे यांची मागणी

महापालिका अतिरिक्त आयुक्तांसमोर मांडले पिंपळे सौंदागरमधील महत्वाचे प्रश्न अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे दिले आश्वासन पिंपरी, (दि. २३ फेब्रुवारी २०२२) : पिंपळे सौदागर हे स्मार्ट शहर म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने विकसित केले आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून मोठी विकासकामे परिसरात राबविली आहेत. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही अपूर्ण तर, काही पूर्ण अवस्थेतेतील प्रकल्प रखडून ठेवली आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत भाजपा चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा तथा उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी महापलिका आयुक्त राजेश पाटील आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची भेट घेतली. दरम्यान, बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, नवीन पाण्याच्या टाक्या व पाईपलाईनची कामे मार्गी ...
इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारून कुंदाताईंनी निर्माण केला आदर्श – महापौर माई ढोरे
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारून कुंदाताईंनी निर्माण केला आदर्श – महापौर माई ढोरे

पिंपळे सौदागरमधील उन्नती कार्यालय येथे चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडमधील मोफत चार्जिंग देणारा एकमेव पायलट प्रोजेक्ट पिंपरी : इंधनावरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे पर्यावरण संवर्धनाला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे निर्माण होणा-या प्रदुषणामुळे नागरिकांच्या जीवनावर दुरगामी परिणाम होत आहे. प्रदुषणाला आळा बसून पर्यावरण संवर्धन होण्यासाठी आपल्याला विधायक पाऊल उचलायला हवे. झाडे लावण्याबरोबरच कुंदाताई भिसे यांनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन सुरू करून इलेक्ट्रीक वाहणे वापरणा-यांना प्रोत्साहन दिले आहे. इलेक्ट्रीक वाहनांना न नफा न तोटा या तत्वावर मोफत चार्जिंगची सुविधा निर्माण करून कुंदाताईंनी पिंपरी-चिंचवडमध्ये आदर्श निर्माण केला आहे, अशी भावना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केली. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंपळे सौदागर परिसरातील इलेक्ट...
पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांनी घेतला चित्रकला स्पर्धेचा आनंद
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांनी घेतला चित्रकला स्पर्धेचा आनंद

उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन त्यांचा संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त स्तुत्य उपक्रम पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन व उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन येथे विशेष-दिव्यांग मुलांकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष मुलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व सर्व सहभागी मुलांना उन्नती फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेत अरिफा बागवान हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर हर्षवर्धन सुरूशे याने द्वितीय व प्रियांका गरुड हिने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच जगदीश बडगुजर यास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विशेष मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम सप्तर्षी फाउंडेशन व उन्नती सोशल फाउंडेशनच्या विशेष प...
उन्नती फाउंडेशनतर्फे सांगवी वाहतूक व आरोग्य विभागात मिठाई वाटप
पिंपरी चिंचवड

उन्नती फाउंडेशनतर्फे सांगवी वाहतूक व आरोग्य विभागात मिठाई वाटप

पिंपरी : पोलिस व आरोग्य कर्मचारी कोणताही सण-उत्सव वैयक्तिक पातळीवर साजरा न करता जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात. त्यांच्या विषयीच्या कृतज्ञतेच्या भावनेतून उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने सांगवी वाहतूक विभाग आणि आरोग्य विभागात मिठाई व भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सांगवी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सतीश नांदूरकर यांचा उन्नती सोशल फाउंडेशन संस्थापक संजय भिसे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक कुटे, गणेश घाटोळकर, योगेश चौधरी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले की, "कोरोना काळात पोलिस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. जनता ज्यावेळी सण किंवा उत्सव साजर...
लोकमैत्रि परिवारातर्फे उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

लोकमैत्रि परिवारातर्फे उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांचा सन्मान

हिंजवडी : उन्नती सोशल फाउंडेशनने कोविड-19 महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामाची पावती म्हणून फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांचा राज्यपालांच्या हस्ते 'महाराष्ट्र कोविड योध्दा' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानिमित्त लोकमैत्रि परिवारातर्फे उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांचा सन्मान केला. मारूंजी येथील लोकमैत्रि परिवाराच्या संकुलात झालेल्या कार्यक्रमात लोकमैत्रि परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शिवाजीराव बुचडे यांच्या हस्ते संजय भिसे यांचा सत्कार झाला. त्यावेळी विलास काटे, रामदास मदने, तात्या शिनगारे, युवा उद्योजक अनिल पवार, सह्याद्री स्काऊट गाईडचे युनिट लीडर बिपीन देशमुख, सनफ्लावर पब्लिक स्कुलचे मुख्याध्यापक सदाशिव धांडे, यश टुटोरिअलचे प्रमुख डी. एम. चव्हाण आदी उपस्थित होते. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने लोकमैत्रि पर...
खांडल विप्र बंधू सेवा ट्रस्टतर्फे उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

खांडल विप्र बंधू सेवा ट्रस्टतर्फे उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा सन्मान

पिंपळे सौदागर : उन्नती सोशल फाउंडेशन अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांना राज्यपालांच्या हस्ते नुकताच 'महाराष्ट्र कोविड पुरस्कार' मिळाला. त्यानिमित्त खांडल विप्र बंधू सेवा ट्रस्टच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व खांडल विप्र बंधु सेवा ट्रस्टचे सभासदांसह नागरिक उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष बच्छराज शर्मा यांनी साई प्लॅटिनम सोसायटी पिंपळे सौदागर येथे कोरोनो काळात काम केलेल्या व्यक्तीचा सन्मान समारंभाचे आयोजन केले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी समाजात नागरिकांच्या समस्या जाणुन घेत त्या सोडवुन व कोरोना काळात समाजासाठी बरीच कामे करत एक आदर्श नगरसेवक म्हणुन शत्रुघ्न बापु काटे यांना पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने दिले व ...
पिंपळे सौदागरमधील विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचा १०० दिव्यांग मुलांनी घेतला लाभ
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमधील विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचा १०० दिव्यांग मुलांनी घेतला लाभ

उन्नती सोशल फाउंडेशन, सप्तर्षी फाउंडेशन आणि प्रेडिक्टिव होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन पिंपळे सौदागर : उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने सप्तर्षी फाउंडेशन आणि प्रेडिक्टिव होमिओपॅथी यांच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीर गुरूवारी (ता. २१) आयोजित करण्यात आले. या शिबिराचा सुमारे १०० दिव्यांगांनी लाभ घेतला. सदर शिबीर दिवंगत डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन व दिपप्रज्वलन उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा हस्ते करण्यात आले. त्यावेळी उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, प्रबोधनकार शारदा मुंढे, रमेश वाणी, सखाराम ढाकणे, आर. के. पाटील, सप्तर्षी फाउंडेशनचे मनोजकुमार बोरसे, प्रकल्प व्यवस्थापक विशाल पवार, क्लेम विभाग प्रमुख रुशाली बोरसे, नंदकिशोर आहेर आदी उपस्थित होते. ...