Tag: Unnati Foundation

गरजू मुलींच्या रूपातील नवदुर्गांना घेतले दत्तक | उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा स्तुत्य उपक्रम
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड, सामाजिक

गरजू मुलींच्या रूपातील नवदुर्गांना घेतले दत्तक | उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा स्तुत्य उपक्रम

https://youtu.be/bK_BoLDHkUg पिंपळे सौदागर : समाजातील अनेक मुली घरची आर्थिक परिस्थिती गरिब असल्याने शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांची स्वप्ने लहानपणीच विरून जातात. मात्र, समाजातील अशा नऊ मुलींचा सर्व शैक्षणिक खर्च उचलत त्यांच्या रूपात नवदुर्गांना पाहात उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी त्यांना दत्तक घेतले आहे. विजयादशमीच्या निमिताने या नवदुर्गांचे पुजन करून त्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे व आवश्यक वस्तू देण्यात आल्या. पिंपरी सौदागर येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी रमेश वाणी, आर. के. पाटील, सखाराम ढाकणे, राजू भिसे, अजिंक्य भिसे समाजसेविका शारदा मुंढे, अशोक वारकर, दिलीप नेमाडे, उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतलेल्या या मुलीत अनेक मुली अनाथ, गतीमंद आहेत. त...
उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे ‘महाराष्ट्र कोविड योद्धा’ पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र, मोठी बातमी

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे ‘महाराष्ट्र कोविड योद्धा’ पुरस्काराने सन्मानित

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान मुंबई : कोरोना महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांचा 'महाराष्ट्र कोविड योद्धा' पुरस्काराने गौरव करण्यात आला. दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा हस्ते कुंदा भिसे यांना 'महाराष्ट्र कोविड योद्धा पुरस्कार' देण्यात आला. शुक्रवारी ( ता. ८ ऑक्टोबर) हा सोहळा मुंबई येथे राजभवनात पार पडला. यावेळी राज्यभरातील विविध ठिकाणच्या अनेक प्रतिष्ठित डॉक्टर, अधिकारी, समाजसेवक यांच्यासह समाजातील विविध कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुंदा भिसे यांना प्रमाणपत्र प्रदान केले. तस...
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जेष्ठांना मोफत छत्र्या वाटप
पिंपरी चिंचवड

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जेष्ठांना मोफत छत्र्या वाटप

उन्नती सोशल फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम पिंपरी सौदागर : येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष कुंदा संजय भिसे यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमूर्तमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वछता अभियान तसेच परिसरातील सुमारे एक हजार जेष्ठ नागरिकांना मोफत छत्र्या वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे जेष्ठांकडून कौतुक करण्यात आले. लिनियर गार्डन कोकणे चौक येथे ज्येष्ठ नागरिक व सर्व उपस्थित नागरिकांनी स्वछता अभियान उपक्रम राबविला. माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप, हभप ऋषिकेश महाराज चोरगे व समाजसेविका शारदा मुंढे यांच्या हस्ते या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थाचे विलास काटे, शिवशंभो सेवा मंडळ अध्यक्ष संपत मेटे, प्रबोधनकारक समाजसेविका शारदा मुंढे, ...
महिला सबलीकरणासाठी उन्नती फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – महापौर माई ढोरे
पिंपरी चिंचवड

महिला सबलीकरणासाठी उन्नती फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – महापौर माई ढोरे

पिंपळे सौदागर : महिला कुठेही कमी पडू नये, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवून स्वता:सह आपल्या परिवाराची व समाजची प्रगती करावी. हा महिला सबलीकरणाचा उद्देश असलेले उन्नती फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा आशयाचे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी येथे केले. उन्नती फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या 'ती'चा गणपती या विशेष गणेशोत्सवानिमित्त महापौर उषा माई ढोरे यांच्या हस्ते गणपती आरती करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. https://youtu.be/mSWNa7Dnthw त्याप्रसंगी उपमहापौर हिराबाई नानी घुले, नगरसेविका आरती चौधे, भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, पिंपरी चिंचवड महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्वला गावडे, आपला आवाज आपली सखी संचालिका संगिता तरडे, माजी नगरसेविका वैशाली जवळकर, नेहा गमे, गौरी कुटे, कविता भिसे, अश्विनी भिसे, मोहिनी मेटे आदी मान्यवरांना गणपती आरतीचा...