उन्नतीच्या वर्धापनदिनानिमित्त सप्ताहभर विधायक उपक्रमांची रेलचेल ; मोफत डोळे तपासणी शिबीरास नागरिकांचा उस्फुर्त सहभाग

उन्नतीच्या वर्धापनदिनानिमित्त सप्ताहभर विधायक उपक्रमांची रेलचेल ; मोफत डोळे तपासणी शिबीरास नागरिकांचा उस्फुर्त सहभाग

  • उन्नतीचा सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, पर्यावरणीय जडणघडणीत सहभाग – कुंदाताई भिसे

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाउंडेशनच्या (Unnati Social Foundation) ५ व्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ४० मधील नागरिकांसाठी सप्ताहभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. २६) रोजी मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दवा इंडिया या जेनेरिक फार्मसी कंपनीच्या सहकार्याने ग्राहकांच्या मेडिकल बिलांवर येत्या १५ जुलैपर्यंत ९० टक्के सवलत दिली जाणार आहे, या योजनेचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला.

शिबिरातील सहभागी लाभार्थ्यांची मशीनमधून डोळे तपासणी करण्यात आली. तज्ञांकडून आजाराबाबत सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात आले. अचूक चष्म्याचा नंबर काढून देण्यात आला. यावेळी उन्नति सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, कार्यकारिणी सदस्य, परिसरातील जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते. शिबिरासाठी ए.एस.जी.आय. हॉस्पिटलचे डॉ. सुहास मोहिते, डॉ. भूमिका धर्मानी, आदिनाथ ओव्हाळ, नर्सिंग स्टाफ तसेच दवा इंडिया जेनेरिक फार्मसीचे वरिष्ठ अधिकारी साजिद नाईकवडी, हर्षल मराठे, आशिष कळमकर, अतुल उदावंत, साहिबा नाईकवडी आदींनी सहकार्य केले. यावेळी जवळपास पाचशे नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. सुरेश वाघाळकर लीनीअर गार्डन गृपचे अध्यक्ष व सदस्य, ॲड. शंकरराव पाटील, डॉ. सुभाषचंद्र पवार, रमेश वाणी, राजेंद्र जयस्वाल, अनिल कुलकर्णी, सतीश पिंगळे, अशोक मटालिया, विजय रोकडे, ऑल सिनियर सिटिझन असोसिएशन व आनंद हास्य क्लब विठाई मोफत वाचनालयचे सर्व पदाधिकारी व सदस्य मधुकर पाटील आदी उपस्थित होते.

उन्नतीच्या वर्धापनदिनानिमित्त सप्ताहभर विधायक उपक्रमांची रेलचेल ; मोफत डोळे तपासणी शिबीरास नागरिकांचा उस्फुर्त सहभाग

उपक्रमाबाबत माहिती देताना अध्यक्षा कुंदाताई भिसे म्हणाल्या, उन्नति सोशल फाउंडेशनने सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पिंपळे सौदागर परिसरात आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. येथील सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, पर्यावरणीय जडणघडणीत गेल्या पाच वर्षात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे परिसरातील प्रत्येक सोसायटीवर्गात उन्नतीच्या कार्याची दखल घेतली जात आहे. उन्नतीच्या वर्धापन दिनानिमित्त सप्ताहाभर विधायक उपक्रमांचे आयोजन केले आहे. १२ वर्षापुढील कोविड बूस्टर डोस लसीकरणासाठी नागरिकांना २५ टक्के खास सवलत देण्यात येणार आहे. शिवाय रक्तदान शिबीर, मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तु बनविणे, निबंध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येनेही सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुंदाताई भिसे यांनी केले आहे.