प्रभाग क्रमांक तीनमधील रस्त्यांची दयनीय अवस्था – सुनील कुसाळकर

प्रभाग क्रमांक तीनमधील रस्त्यांची दयनीय अवस्था - सुनील कुसाळकर

बाळासाहेब मुळे :लोकमराठी न्यूज नेटवर्क

चिखली : जाधववाडी परिसरातील प्रभाग क्रमांक तीन मधील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत, हे सांगणे कठीण आहे. असे सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग शहर उपाध्यक्ष सुनील कुसाळकर यांनी लोकमराठीशी बोलताना सांगितले.

अजून पुढे बोलताना ते म्हणाले की, आत्ताच रस्त्यांची एवढी दुरावस्था झालेली आहे. अजून तर चांगल्या प्रकारे पाऊस सुरू झालेला नाही, येणाऱ्या काळामध्ये पाऊस जोरदार झाल्यानंतर रस्त्याची अवस्था काय होईल? याची कल्पनाही करवत नाही. त्या रस्त्याने आज नागरिकांना पायी चालता येत नाही आणि आता तर शाळा कॉलेजेस सुरू असल्यामुळे लहान मुलांना महिला भगिनींना आणि आबालवृद्धांना रस्त्याने पायी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आणि म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी जनमानसातून मागणी होताना दिसत आहे.