उन्नती फाउंडेशनतर्फे सांगवी वाहतूक व आरोग्य विभागात मिठाई वाटप

उन्नती फाउंडेशनतर्फे सांगवी वाहतूक व आरोग्य विभागात मिठाई वाटप

पिंपरी : पोलिस व आरोग्य कर्मचारी कोणताही सण-उत्सव वैयक्तिक पातळीवर साजरा न करता जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात. त्यांच्या विषयीच्या कृतज्ञतेच्या भावनेतून उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने सांगवी वाहतूक विभाग आणि आरोग्य विभागात मिठाई व भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.

तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सांगवी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सतीश नांदूरकर यांचा उन्नती सोशल फाउंडेशन संस्थापक संजय भिसे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

उन्नती फाउंडेशनतर्फे सांगवी वाहतूक व आरोग्य विभागात मिठाई वाटप

त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक कुटे, गणेश घाटोळकर, योगेश चौधरी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

त्यावेळी उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले की, “कोरोना काळात पोलिस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. जनता ज्यावेळी सण किंवा उत्सव साजरे करत असते, त्यावेळी ते आपले वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून जनसेवेसाठी सदैव हजर असतात. त्यांच्याबाबत प्रत्येकाने कृतज्ञतेचा भाव ठेवणे गरजेचे आहे.”