पिंपळे सौदागरमध्ये संगीत सुरांनी दिवाळी पहाट उत्साहात साजरी

पिंपळे सौदागरमध्ये संगीत सुरांनी दिवाळी पहाट उत्साहात साजरी
  • उन्नती सोशल फाउंडेशन व शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनतर्फे केले होते आयोजन

पिंपरी : उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या वतीने सलग दोन दिवस स्वरामृत दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन येथे संगीत सुरांच्या मेजवानीचा शहरातील नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला. संगीत अलंकार राधाकृष्ण गरड गुरूजी, प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन, ज्योती गोराणे व चंद्रभागा सातव यांच्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

त्यावेळी महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदायाचे पुणे शहराध्यक्ष चंद्रकांत महाराज वांजळे, पुरूषोत्तम महाराज पाटील (मनमंदिरा), युवा कीर्तनकार संतोष महाराज पायगुडे, वारकरी संप्रदायाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजू अण्णा जगताप, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, पवना बँकेचे व्हॉईस चेअरमन जयनाथ काटे, प्रकाश झिंजुर्डे, विजय भिसे, उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, पीके स्कुलचे संस्थापक जगन्नाथ काटे, माजी नगरसेवक आप्पासाहेब बागुल, उत्तम धनोटे, विलास काटे, प्रबोधनकार शारदा मुंढे, सुरेश कुंजीर, शिवशंभो सेवा अध्यक्ष संपत मेटे, बाळासाहेब बुंडे, शंकर पाटील, रमेश वाणी, दत्ताभाऊ चिंचवडे, खंडूभाऊ झिंजुर्डे, शेखर सुखदेव काटे, मल्हारी कुटे, भरत काटे, दत्ता काटे, शंकर चौधे, माऊली हांडे, विकास म. काटे, भानुदास काटे, आदेश काटे यांच्यासह पिंपळे सौदागरमधील सर्व ज्येष्ठ नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पिंपळे सौदागरमध्ये संगीत सुरांनी दिवाळी पहाट उत्साहात साजरी
पिंपळे सौदागर : दिवाळी पहाट कार्यक्रमात गाताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे.

कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन करून झाली. राधाकृष्ण गरड गुरूजी, गायिका ज्योती गोराणे, चंद्रभागा सातव व मुग्धा वैशंपायन यांनी आपल्या मधुर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना वादक शाम गोराणे (तबला), बालकलाकार सोहम गोराणे, गणेश टाके (पखवाज), संतोष म. राऊत (कोरस), उमेश पुरोहित (हार्मोनियम), उद्धव गोळे (मृदुंग), शामजी गोराणे (तबला), विश्वास कळमकर (टाळ) यांनी साथ दिली. यावेळी अभंग, भक्तिगीते, लावणी, देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी गवळण सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

वांजळे महाराज व पुरूषोत्तम महाराज यांनी आपल्या मनोगतात उन्नती सोशल फाउंडेशन व शत्रुघ्न काटे युथ फॉउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

वांजळे महाराज म्हणाले की, “उन्नती सोशल फाउंडेशनचे समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम सुरू असून नवरात्रीमध्ये गरजू मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलला, दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी शिबिर आयोजित केले. तर गतिमंद अनाथ मुलांबरोबर दिवाळी साजरी केली. अशा पद्धतीने सतत काहीना काही उपक्रम सुरू असतात. करोना काळात उन्नती फाउंडेशनने केलेल्या कामाची दखल घेत फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांना महाराष्ट्र कोविड योद्धा पुरस्कार देऊन राज्यपालांनी सन्मानित केले. ही खुप अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर उन्नती फाउंडेशन वारकरी संप्रदायासाठीही मोलाचे कार्य करत आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुलसीदास घोलप सर यांनी केले.

पिंपळे सौदागरमध्ये संगीत सुरांनी दिवाळी पहाट उत्साहात साजरी