चिखलीत आढळलेल्या १८ किलो व नऊ फुटी अजगराला मिळाले जिवनदान (Video)

चिखलीत आढळलेल्या १८ किलो व नऊ फुटी अजगराला मिळाले जिवनदान (Video)

पिंपरी : चिखली येथील नेवाळे वस्ती परिसरात आढळलेल्या १८ किलो वजनाच्या व नऊ फुटी लांबीच्या अजगरास सर्पमित्रांमुळे जीवनदान मिळाले. ही घटना रविवारी (ता. ३ ऑक्टोबर) रात्री घडली.

वर्ल्ड फॉर नेचरचे वन्यजीव संरक्षक वैभव करूंद यांना रात्री अडीचच्या सुमारास नेवाळे यांनी संपर्क साधून मोठा अजगर आढळल्याची माहीती दिली. माहीती मिळताच वैभव करूंद घटनास्थळी निघाले. त्यांगा वाटले त्या ठिकाणी घोणस जातीचा साप असेल, कारण बऱ्याचदा लोक घोणस दिसल्यानंतर अजगर आला आहे. अशी माहाती कळवतात परंतु, नेवाळे वस्तीमध्ये पोहोचल्यानंतर करूंद आश्चर्यचकीत झाले. कारण, अजगर हा शहरी भागात आढळत नाही. एवढ्या मोठ्या अजगरास पकडणे एकट्याला शक्य झाले नसल्याने करूंद यांनी विशाल पाचूडे यांची मदत घेऊन अजगरास पोत्यामध्ये टाकले.

त्यानंतर अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी मुळशी तालुक्यातील उरवडे हे ठिकाण निवडण्यात आले. कारण हे अजगरांसाठी अनुकुल वातावरण असून भरपूर आहार देखिल आहे.

अजगराम नैसर्गिक अधिवासात मुक्त करताना वन्यजीव संरक्षक वैभव करूंद, वर्ल्ड फॉर नेचरचे संस्थापक-अध्यक्ष शुभम पांडे, योगेश कांजवणे, शरद गुंड, रामानंद गावडे, किरण पुजारी, दिपक शर्मा, रियाज शेख, राजू कदम, गिरीश पालखे, आतिश गावडे, आशुतोष देवकर उपस्थित होते.

दरम्यान, हा अजगर नदीला पाणी सोडल्यामुळे ओघात आल्या असल्याची शक्यता आहे. अजगर अतिशय उत्तम स्थितीत असून त्यावर कोणत्याही प्रकारचा उपचार करण्याची गरज नव्हती. या अजगराला सोडल्याची कल्पना वन विभाग अधिकारी बर्ले यांना देण्यात आली. असे वर्ल्ड कॉर नेचरचे संस्थापक-अध्यक्ष शुभम पांडे यांनी सांगितले.