धक्कादायक : हप्ता दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलांचा दुकानदारावर कोयत्याने वार | पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना

धक्कादायक : हप्ता दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलांचा दुकानदारावर कोयत्याने वार | पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना

पिंपरी-चिंचवड शहरात भरदिवसा कापड दुकानात जाऊन हप्ता द्या अन्यथा व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकी देत कोयत्याने दुकानदारावर वार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत दुकानात काम करणारे दोन तरुण जखमी झालेत. कासीम अस्लम शेख (वय २६) या तरुणाने पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे.

व्हिडीओ पहा : https://youtu.be/n8CSVBzAyRQ

https://twitter.com/lokmarathi/status/1437846367406231554?s=19

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील डीलक्स चौक येथे मिस्टर मॅड या नावाचे कापड दुकान आहे. तिथे तीन अल्पवयीन मुलं कोयता घेऊन दुकानात शिरले, त्यांनी व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्या, असं म्हणून हप्ता मागितला आणि धमकावले. मात्र, दुकानात मालक नसल्याने कामगार गोंधळून गेले होते. काही कळण्याच्या आत अल्पवयीन मुलांनी कोयता काढून वार केले, तर कामगार तरुणाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला व हातावर वार झेलले आहेत. या अल्पयीन मुलांनी काउंटरची तोडफोड करत दुकानाबाहेरील पुतळ्याचेही मोठे नुकसान केले आहे. या घटनेमुळे दुकानात काम करणारी मुले भीतीच्या सावटाखाली आहेत. घटनेत दोनजण जखमी झाले असून या प्रकरणी पिंपरी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार, तीन अल्पवयीन मुलं ताब्यात घेण्यात आली आहेत.