
चिंचवड : वाल्हेकरवाडी परिसरात रोडरोमिओंनी हैदोस घातला असून मुलींची छेडछाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग मोठा आहे. एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी तातडीने दखल घेऊन या रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाल्हेकरवाडीत ठिकाणी या रोडरोमिओंचे टोळके थांबलेले असते. रस्त्यावरच आरडाओरडा, मस्ती, अश्लील शिवीगाळ व ये-जा करणाऱ्या मुलींची छेड काढणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलेही असतात. हे सर्व टोळके स्थानिक असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास पुढे कोण येत नाही. सायली कॉम्प्लेक्स ते मराठी शाळा चौक दरम्यान, मशिदीसमोरील मुख्य रस्ता, याठिकाणी रोडरोमिओंचा जास्त त्रास असून नागरिक हैराण झाले आहेत.
‘बहिणीची छेड काढली म्हणून तरूणाचा खुप, बलात्काराच्या बदल्यात बलात्कार, छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून मारहाण, खुन’ अशा अनेक घटना देशातील विविध भागात घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी अनुचित घटनेची वाट न बघता, तात्काळ कार्यवाही करत, परिसरात गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करावे. अशी महिलांची आग्रहाची मागणी आहे.
