उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वतीने गौरव

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वतीने गौरव

पुणे, दि.१५ (लोकमराठी) – उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचा विशेष पोलीस महानिरीक्षक(IG) कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांच्या वतीने गौरवण्यात आले.

गेल्या वर्षभरामध्ये आंबेगाव तसेच जुन्नर तालुक्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.काबाड कष्ट करून सामान्य माणूस हप्ते भरून मोटारसायकल विकत घेत असतात त्यातच अश्या प्रकारे गाड्या चोरीला गेल्याने नागरिक त्रस्त होते.

गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोहीम राबवून सदर भागामध्ये अश्या गुन्ह्यामध्ये संशयित असलेल्या इसमांची धरपकड स्थानिक गुन्हे शाखे मार्फत करण्यात आली. अखेर मार्च महिन्यामध्ये तब्बल १०/१२ आरोपी पकडून त्यांच्याकडून सुमारे ५० मोटारसायकल जप्त करून त्या फिर्यादींना परत करण्यात आल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाई मुळे परिसरामध्ये मोटारसायकल चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये जरब बसली असून मोटारसायकल चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. नागरिकांमधून सुद्धा गुन्हे शाखेच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.

या उत्कृष्ट कामगिरी साठी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक(IG) कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी सर यांच्या वतीने सदर कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

यामध्ये गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर, सपोनि महादेव शेलार, पोहवा.दीपक साबळे, पोहवा राजू मोमीन, पोना संदीप वारे, पोना अक्षय नवले यांचा समावेश होता.