
पिंपरी-चिंचवड (लोकमराठी) : पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा विळखा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शनिवारी (११ एप्रिल) रात्री ११ वाजल्यापासून दापोडी, कासारवाडी परिसर सील करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा भाग 'सील' असणार आहे. तसेच शुक्रवारपासून (१० एप्रिल) भोसरीतील काही भागही सील केला आहे. पाच दिवसांपूर्वी खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर सील केला आहे. शनिवारपर्यंत पिंपरी-चिंचवडमधील सात भाग 'सील' केले आहेत.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा भाग 'सील' केला आहे.
सील करण्यात आलेला परिसर
विनियर्ड चर्च परिसर, दापोडी (माता शितळादेवी चौक - विनियर्ड चर्च - सुखवानी ग्लोरी - पब्लिक फूड शेल्टर - धूम मेन्स पार्लर पिंपळे गुरव रोड - माता शितळादेवी चौक) व डायमंड प्लास्टिक कंपनीजवळ कासारवाडी (सिद्धार्थ मोटार कासारवाडी - दत्तमंदिर - पिंपळे भारत गॅस - सीएमई बॉन्ड्री - सीएमई बॉन्ड्री - सीएमई बॉन्ड्री - सीएमई बॉन्ड्री - सिद्धार्थ मोटार, कासारवाडी)
चांदणी चौक (पीएमपी चौकाजवळ), भोसरी (पूजा टुर्स अँड ट्रॅव्हल्स - भोसरी मेन रोड - मॉन्जिनी केक शॉप - मेघना सोनोग्राफी सेंटर - लांडेवाडी रोड - पिंपरी-चिंचवड महपालिका भोसरी करसंकलन कार्यालय - भगवान गव्हाने चौक - लोंढे गिरणी हा भागदेखील शुक्रवार 'सील' केला आहे. तसेच खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर 'सील' केला आहे.
- Santosh Deshmukh : प्रिय संतोष देशमुख, तुमच्या खूनाचे फोटो मी बघितलेच नाहीत - हेरंब कुलकर्णी
- International Women's Days : वंचितांसाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम
- PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत
- PIMPRI:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरू नये म्हणून पतीने रचला बनाव…
- MUMBAI:प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ…