Tag: lokmarathi

Coronavirus : पुण्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर तर रुग्ण संख्या २०४
पुणे, मोठी बातमी

Coronavirus : पुण्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर तर रुग्ण संख्या २०४

पुणे (लोकमराठी): पुण्यात दिवसेंदिवस परिस्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रत्येक दिवसाला नवा आकडा नोंदवून तो वाढला जातोय. आज हा 204 वप पोहचला आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामती तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. काल पुण्यात एकाच दिवशी 8 जणांना कोरोनाने आपले प्राण गमवावे लागले. पुणे शहरात १६८, पिंपरी चिंचवड २२, पुणे ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या आजपर्यंत(गुरूवार दुपार) नोंदवली गेली आहे. अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दरम्यान, पुण्यात रूग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता प्रशासनाने अधिक खबरदारी घेतली आहे. कामाविना फिरणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल होणार आहे. तर अत्यावश्यक गरजांसाठी बाहेर पडणाऱ्या सगळ्यांना आता मास्क लावणं बंधनकारक आहे. ...
कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी माजी सैनिक सज्ज
राष्ट्रीय

कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी माजी सैनिक सज्ज

या कठीण प्रसंगी स्वतःहून सेवा देण्याचे सेवानिवृत्तांचे उद्दिष्ट नवी दिल्ली, 2 एप्रिल : कोविड -19 महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना राष्ट्र करीत असताना, संरक्षण मंत्रालयाच्या (एएसएम) माजी सैनिक कल्याण विभागाने (ईएसडब्ल्यू),आवश्यक तेथे मनुष्यबळ वाढवून राज्य आणि जिल्हा प्रशासनास मदत करण्यासाठी माजी सैनिकांची मदत घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एखादा संपर्क क्रमांक शोधणे, सामुदायिक पाळत ठेवणे, विलगीकरण सुविधांचे व्यवस्थापन किंवा त्यांना नेमून दिलेले कोणतेही सार्वजनिक उपक्रम राबविण्यात राज्य आणि जिल्हा प्रशासनास मदत करण्यासाठी जास्तीत जास्त सेवानिवृत्त स्वयंसेवकांची ओळख पटवून त्यांना एकत्रित करण्यात राज्य सैनिक मंडळे आणि जिल्हा सैनिक मंडळे महत्वाची भूमिका बजावत आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीत देशाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत स्वतःहून सेवा दे...
यशस्वी होण्यासाठी महापुरुषांची चरित्रे वाचा – डॉ. खेडकर
पिंपरी चिंचवड

यशस्वी होण्यासाठी महापुरुषांची चरित्रे वाचा – डॉ. खेडकर

पिंपरी (लोकमराठी) : ज्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे त्या क्षेत्रातील यशस्वी झालेल्या महापुरुषांची चरित्रे वाचली पाहिजेत. त्यांचा आदर्श घेवून वाटचाल करावी. असे मत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे उपकुलपती तथा उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांनी दिला. म्हेत्रे वस्ती-चिखली येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने समाजसेवक श्रीनिवास राठी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रकाश दिलपाक यांना समाज गौरव पुरस्कार,साधना चव्हाण व पल्लवी कांबळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अखिल भारतीय धनगर समाज प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, शिवाजी घोडे, हनुमंत म्हेत्रे, अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकट वाघमोडे, उपाध्यक्ष मोहन देवकाते आदी उपस्थित ...
PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी चिंचवड

PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

रस्ते डांबरीकरणाच्या लेखी आश्वासनाचा अधिकाऱ्यांना पडला विसर काळेवाडी (लोकमराठी) : विविध विकास कामांसाठी खोदण्यात आलेल्या काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन दखल घेत नाही. विशेष म्हणजे रस्ते डांबरीकरणाचे लेखी आश्वासन देऊनही प्रशासन गंभीर नसल्याने रस्ते दुरूस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. पाणीपुरवठा वाहिनी, सांडपाणी वाहिनी तसेच खासगी टेलिफोन कंपन्यांची केबल टाकण्यासाठी ज्योतीबानगर, राजवाडेनगर, कोकणेनगर परिसरातील रस्त्यांची खोदाई करण्यात आली. मात्र, त्यांची दुरूस्ती योग्य पद्धतीने न झाल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. काही रस्ते विविध कामांसाठी सतत खोदल्याने रस्त्यांवर खड्डे पडले असून खडी पसरली आहे. त्यामुळे घसरून पडण्याचे अपघात नि...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात ठाण्यात हिंदुत्वनिष्ठांचे निषेध आंदोलन
महाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात ठाण्यात हिंदुत्वनिष्ठांचे निषेध आंदोलन

सावरकरांचा अवमान करणाऱ्या पुस्तकावर देशभरात तत्काळ बंदी घालावी, अन् संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी ठाणे : भोपाळ येथे काँग्रेस सेवादलाच्या प्रशिक्षण शिबिरात 'वीर सावरकर कितने ‘वीर ?' या नावाने वाटण्यात आलेल्या पुस्तकामध्ये अत्यंत हीनकस, स्वा. सावरकरद्वेषी आणि धादांत खोटारडे लिखाण केले आहे. यातून काँग्रेसवाले स्वातंत्र्यवीरांना बदनाम करण्यासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, हेच दिसून येते. स्वा. सावरकर यांचाच नव्हे, तर कोणत्याही राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा अवमान कोणाकडूनही होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने तत्काळ यासंदर्भात कायदा करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसने वाटलेल्या पुस्तकातून देशात धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचाही कुटील हेतू दिसून येतो. काँग्रेसचा स्वा. सावरकरद्वेष, हा संपूर्ण क्रांतीकारी चळवळीविषय...
कांदा व्यापाऱ्याची ४२ लाखाची फसवणूक
महाराष्ट्र

कांदा व्यापाऱ्याची ४२ लाखाची फसवणूक

सोलापूर, दि. २० (लोकमराठी) : सोलापूरातील कांदा व्यापारी उस्मान अब्दूल गफुर बागवान (वय ५१, रा. तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर) यांची ४२ लाख २३ हजार ९३९ रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यांच्याकडून कांदा घेवून ठरलेल्या भावापेक्षा कमी पैसे दिले. थकीत रक्कम न दिल्याने मिरासाब आणि सिराज (रा. जिना मक्कल, तामीळनाडू) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागवान यांचा कांदा विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतकऱ्याकडून घेतलेला कांदा हे मिरासास आणि सिराज यांच्याकडे जुना पुना नाका येथे ट्रकने तामीळनाडू येथे पाठवला होता. ओळख असल्यामुळे बागवान हे मिरासाब आणि सिराज यांच्यासोबत व्यवहार करित होते. सुरवातीला काही दिवस व्यवहार व्यवस्थित झाला. त्यानंतर मात्र मिरासाब आणि सिराज या दोघांनी ठरलेल्या भावापेक्षा कमी पैसे दिले. उर्वरित रक्कम नंतर देतो म्हणून टाळाटाळ केली. अद्यापर्यंत थकीत रक्कम दिली नाही. बागवान यां...
कचरा प्रश्नी, आता थेट आयुक्तांच्या बंगल्यावरच डस्टबिन आंदोलन – अपना वतन संघटना
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

कचरा प्रश्नी, आता थेट आयुक्तांच्या बंगल्यावरच डस्टबिन आंदोलन – अपना वतन संघटना

Lok Marathi News Network पिंपरी चिंचवड : शहरामध्ये मागील अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवकांनी स्वतः वारंवार मागणी करूनही कचरा प्रश्न मार्गी लावण्यात महापालिकेला अपयश आले आहे. काहीही असले तरी आरोग्यप्रमुख व आयुक्त श्रावण हर्डीकर हेच या समस्येला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी येत्या शनिवारपर्यंत (दि. १३) तातडीने तोडगा काढावा. अन्यथा अपना वतन संघटनेच्या वतीने रविवार (दि. १४) सकाळी १० वाजता आयुक्त हर्डीकर यांच्या बंगल्यावर डस्टबिन आंदोलन करण्यात येईल. असा इशारा अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी दिला आहे. १ जुलै पासून आरोग्य विभागाने कचरा संकलन व वाहनाचे काम बीव्हीजी इंडिया व ए. जी इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपन्यांना दिले आहे. त्यापोटी त्यांना लाखो रुपये देण्यात येणार आहेत. परंतु आठवडा उलटून गेला तरी या दोन्ही कंपन...