नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांसाठी १५ हजार रूपयांचा धनादेश

नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांसाठी १५ हजार रूपयांचा धनादेश

काळेवाडी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना १५ हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघांचे संस्थापक सुभाष पवार यांच्याकडे पाडाळे यांनी १५ हजार रूपयांचा धनादेश सुपूर्त केला. दरम्यान, पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूची मदत या आधीच तातडीने पाठवण्यात आली होती.

नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांसाठी १५ हजार रूपयांचा धनादेश

त्यावेळी नगरसेविका निता पाडाळे, विलास पाडाळे, गितेश दळवी, मनोहर भोसले, राजु पवार, संतोष चिकणे, अशोक पवार यांच्यासह महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.