काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

पिंपरी : काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोकण पुरग्रस्तांना एक हात मदतीचा या भावनेतून काळेवाडी भागातील सर्व शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकांच्या मदतीने जमा झालेल्या जीवनावश्यक वस्तू हभप समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.

महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ पिंपरी चिंचवड या संस्थेचे संस्थापक सुभाष पवार, मनोहर भोसले रमेश साळुंके, सचिन साळुंके, अविनाश उत्तेकर, रवींद्र चव्हाण, नंदु जाधव, निलेश मोरे यांच्याकडे या वस्तू सुपूर्त करण्यात आल्या.

यावेळी शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख दस्तगीर मणियार, शिवसेना उपशहर प्रमुख हरेश आबा नखाते,

विभाग प्रमुख गोरख पाटील, एकनाथ मंजाळ, गणेश आहेर, सुनील विटकर, नेताजी नखाते, संतोष कुंभार, राजेंद्र भरणे, नरसिंग माने शाखा प्रमुख, सावता महापुरे शाखा प्रमुख, जितू वीटकर, अनिल पालांडे, सोमनाथ नळकांडे, रवी घडशि व काळेवाडी भागातील आजी माजी शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपशहर प्रमुख हरेश आबा नखाते यांनी केले.