शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्षा पदी शैला पाटील
पिंपरी (Lokmarathi News) : शिवसेना (शिंदे गट) चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या महिला शहराध्यक्षा पदी शैला चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली. शिवसेना उपनेते व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
त्यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, जिल्हा संघटिका शैला पाचपुते, शहर संघटीका सरिता साने आदी उपस्थित होते.
शैला पाटील यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहेत. त्यामध्ये प्रेमरंग, बिंडी, सर्जा, तांडव सिरिअल दख्खनचा राजा, ऐकविरा आई, वेबसिरिज प्रेमाच्या पलिकडे या प्रमुख चित्रपट व सिरीयल मध्ये कामे केलेल्या असल्यामुळे शैला पाटील यांची पिंपरी चिंचवड शहराच्या शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाला शैला पाटील यांचा संघटना बांधण्यासाठी फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
...