हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडी शिवसेना शाखा नामफलकाचे उद्घाटन

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडी शिवसेना शाखा नामफलकाचे उद्घाटन

पिपरी : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडी शिवसेना शाखा नामफलकाचा उद्घाटन समारंभ रविवारी (ता. २३) काळेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डि-मार्ट जवळ संपन्न झाला. यावेळी शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली, तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमाचे नियोजन उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते व शिवसेना काळेवाडी राहटणीच्या वतीने करण्यात आले.

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडी शिवसेना शाखा नामफलकाचे उद्घाटन

त्याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी चिंचवड युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, ज्येष्ठ शिवसैनिक बाबासाहेब भोंडवे, दिलीप भोंडवे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष दस्तगीर मणियार, अधिकराव भोसले, ओंकार मुळे, प्रहारचे संजय गायखे, विकास काजवे, मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर, चिंचवड विधानसभा सहसंघटिका शारदा वाघमोडे, सुजाता हरेश नखाते, तस्लिम शेख, काळेवाडी विभागप्रमुख गोरख पाटील, रहाटणी-श्रीनगर विभागप्रमुख प्रदिप दळवी, रहाटणी-श्रीनगर विभाग संघटक अंकुश कोळेकर, काळेवाडी विभाग संघटक गणेश वायभट, काळेवाडी उपविभाग प्रमुख सागर शिंदे व अनिल पालांडे उपस्थित होते.

त्याचबरोबर रहाटणी-श्रीनगर उपविभाग प्रमुख कानिफनाथ तोडकर व हनुमंत पिसाळ, काळेवाडी विभाग समन्वयक बाळासाहेब येडे, रहाटणी-श्रीनगर विभाग समन्वयक अमित इथापे, रहाटणी-श्रीनगर सहसंघटक रविकिरण घटकार, काळेवाडी विभाग समन्वयक सुहास शहाळे, काळेवाडी शाखा प्रमुख नरसिंग माने व सावता महापुरे, रहाटणी-श्रीनगर शाखा प्रमुख अरुण हुमनाबाद, दत्ता गिरी, अक्षय घटकार, स्वप्निल शहाणे, रोहित धवन यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.