पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची गुटखा विक्रेत्यावर कारवाई | दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची गुटखा विक्रेत्यावर कारवाई | दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : गुटखा बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या दुकानदारावर पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून सुमारे दोन लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमालासह जप्त करण्यात आला. ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरगाव परिसरात शनिवारी (ता. २२ जानेवारी) करण्यात आली. अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिली.

महेंद्र पनाराम भाटी (वय २६, रा. सर्व्हे नंबर १८/८ शिव कॉलनी, गणेश नगर, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात विविध कलमान्वये वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपायुक्त डॉ. डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार सामाजिक सुरक्षा पथक गोपनिय माहिती काढत होते. त्यावेळी २२ जानेवारी २०२२ रोजी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायदयासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखुजन्य गुटख्याची न्यु हनुमान ट्रेडर्स या नावचे दुकानामध्ये व सँन्ट्रो कार (एम. एच ०२ जे.पी. ३१७८) हिचेमध्ये साठवणुक करुन थेरगाव, वाकड परिसरात विक्री करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई करण्यात आहे.

दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवर्धन सहकारी संस्था मर्यादित सर्वे नं. १९/१/१५ साईकृष्ण पार्क, डांगे चौक, थेरगाव, पुणे. या बिल्डींगमधील शॉन नंबर २ मधील न्यु हनुमान ट्रेडर्सचा मालक नामे महेंद्र भाटी हा त्याचे न्यु हनुमान ट्रेडर्स या नावचे दुकानामध्ये व कार हिचेमध्ये साठवणुक करुन थेरगाव, वाकड परिसरात विक्रीसाठी जाणार आहे. अशी गुप्त बातमीदारकडुन मिळालेल्या माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने सापळा छापा टाकला.

त्यावेळी त्या ठिकाणी ७९० रोख रक्कम, एक लाख १४ हजार ४१३ रूपये किमतीचा गुटखा व एक लाख १० रूपये किमतीची सँन्ट्रो कार असा एकुण दोन लाख २५ हजार २०३ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या अधिकाऱ्यांची कामगिरी

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अधिकारी उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस अमंलदार किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुठे, अमोल साडेकर, सचिन गोनटे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, अतुल लोखंडे, संगिता जाधव, सोनाली माने यांनी केली.